Sangli Samachar

The Janshakti News

सावधान! यंदा एप्रिल आणि मे महिना असणार आहे 'हॉट', कारण...



सांगली समाचार - दि ५ एप्रिल २०२४
नवी दिल्ली  - २० मार्च २०२४ रोजी विषुवदिन होता.‌ म्हणजे पृथ्वीवर बरोबर विषुववृत्तावर सूर्य लंबरूप किरणे टाकत होता. उत्तरायण सुरू असतांनाच २३ मार्च २०२४ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार ७ वाजून एक मिनिटांनी सुर्यावर विस्फोट झालेत. यामुळे तयार झालेले सौर धुमारे पृथ्वीच्या वातावरणावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा दोन्ही भौतिक व रासायनिक प्रक्रियेतून ताबडतोब तसेच दीर्घकालीन परिणाम करणार आहेत. परिणामी तापमान वाढीचे भोवरे म्हणजे 'टेंपरेचर इंडीज' हे उष्णतेच्या लाटा महाराष्ट्रासह देशात तसेच जगातील इतर भागात देखील निर्माण होतील.

'जेट स्ट्रीट'मुळे तापमान ५० डिग्रीच्या पलीकडे जात दुष्काळ आणि उष्माघाताचा प्रहाराने जीवित व वित्तहानीचा धोका अधिक वाढवित आहे जे गांभिर्याने घेणे आवश्यक आहे. अवकाशातून सर्वात शक्तिशाली स्वरूपातील X1.1 (एक्स वन पॉइंट वन) सौर धुमाऱ्या (solar flares) प्रमाणेच इतरही कमी अधिक पृथ्वीच्या दिशेने झेपावत आहेत. मॅग्नेटोस्फिअर म्हणजे पृथ्वीची चुंबकीय कवचकुंडले भेदत सौर धुमाऱ्याच्या लॉंग वेव रेडिएशन प्रारणे वातावरणात शिरत आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात उष्णता‌ पृथ्वीच्या वातावरणात शिरत आहेत. निर्माण होत झालेल्या विस्फोटामुळे भारतासह महाराष्ट्रात ऊष्णतेची लाट आली आहे. त्यांचे परिणाम जगभर होत आहेत तसेच भारतात देखील होत आहेत. यामुळेच महाराष्ट्रात व इतर राज्यात देखील अचानक मार्चमध्ये उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. परिणामी उष्णतेचे नवीन रेकॉर्ड पहायला मिळत आहेत. रॉयल नेदरलँड्स मेटिऑरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (KNMI) देखील पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये बदल नोंदविले आहेत असे या घटनेचे शास्त्रीय विश्लेषण आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्याची काळजी घ्यावी. बाष्पीभवनाचा वेग वाढत पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे.

सुर्यिक कंडिशन (सौर विदयुत चुंबकीय वादळे, सौर डागांच्या आकार, संख्या व व्याप्ती आदी), तापमान स्थिर ठेवणाऱ्या वड, पिंपळ, चिंच आदी देशी डेरेदार व जमिनीत पाणी धरून ठेवणारी मुळे असलेली झाडांची मोठ्याप्रमाणात झालेली कत्तल, वाढलेली सिमेंटची बांधकामे आणि डांबरी आणि सिमेंटच्या रस्त्यांमुळे तसेच समन्वय व नियोजनाचा अभाव या कारणामुळे तापमानामध्ये वाढ होत आहे.  मार्च महिना हा हिवाळा ते उन्हाळ्यात संक्रमण दर्शवितो. मार्चमध्ये इतर महिन्यांच्या तुलनेत कमी ढगांचे आच्छादन दिसते, ज्यामुळे अधिक थेट सूर्यप्रकाश पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचू शकतो आणि तापमानात आणखी वाढ होते. मात्र मान्सून पॅटर्न सह एकंदर चित्र बदलले आहे. उन्हाळ्याची सुरुवात मानवी जाणाऱ्या मार्च महिन्यात उष्णतेची लाट येते आहे. अशावेळी घाबरून न जाता मानवी शरीरात तापमान नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेवर ताण येत तिच्यात बिघाड निर्माण होत उष्माघाताचा फटका बसू नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

उष्णतेचा आणि शेतीचा घनिष्ट संबंध आहे. वेगवेगळ्या पिकांना तापमान‌ आणि आवश्यक पाणी यांची मात्रा ही वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी लागते हे शेतकरी जाणतो. म्हणूनच शेती उत्पादन घेताना येत्या काळात वातावरणात होणाऱ्या बदलांची माहिती अत्यंत अचूक व रियल टाइम मोबाईलवर २४ बाय ७ उपलब्ध होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी देखील आपल्या अनुभवानुसार सकारात्मक विचाराने गरजेच्या उपाययोजना व सुयोग्य निर्णय घेत कृती करणे हे फायदेशीर ठरेल.

अशी काम करते शरीर तापमान नियंत्रण यंत्रणा !
मानवी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी नैसर्गिक शीतकरण यंत्रणा म्हणून घाम येतो. जेव्हा शारीरिक हालचाली, उच्च तापमान किंवा भावनिक ताण यासारख्या कारणांमुळे शरीर गरम होते तेव्हा त्वचेतील घाम ग्रंथी घाम निर्माण करतात. त्वचेच्या पृष्ठभागावरून घामाचे बाष्पीभवन होत असताना, ते शरीरातील उष्णता ऊर्जा शोषून घेते, ते थंड होण्यास आणि स्थिर अंतर्गत तापमान राखण्यास मदत करते. अतिउष्णता आणि उष्णतेशी संबंधित आजार टाळण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा त्वचेतून पाण्याचे बाष्पीभवन होते, तेव्हा ते शरीरातील उष्णता शोषून घेते, ज्यामुळे शीतकरणाचा परिणाम होतो. मात्र, वातावरणात जेव्हा आर्द्रता जास्त होते व दमट परिस्थिती निर्माण होते तेव्हा शरीरातून बाहेर पडणारा घाम कमी निघतो तसेच बाष्पीभवन कमी कार्यक्षमेने होत असते. ज्यामुळे शरीराला थंड होण्यास वेळ लागतो. ज्यामुळे ते प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा जास्त गरम वाटते. शरीराचे तापमान वाढत जास्त अस्वस्थता आणि उष्माघात सारखे उष्णतेशी संबंधित आजार होतात असे शास्त्रीय कारण आहे.