Sangli Samachar

The Janshakti News

जन्म नोंदणी प्रक्रियेत झालाय मोठा बदल! केंद्राकडून आली मोठी अपडेटसांगली समाचार दि ७ एप्रिल २०२४
नवी दिल्ली  - जन्म दाखला हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहे. अगदी शाळेत प्रवेशापासून पुढे अनेक गोष्टींसाठी जन्म दाखला विचारला जातो. त्यामुळे बाळ जन्माला आल्यावर लगेच जन्मदाखला काढण्याकडे पालकांचा भर असतो दरम्यान जन्म नोंदणी संदर्भात गृह मंत्रालयाकडून मोठे बदल करण्यात येत आहेत.

याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी. 

आता कुटुंबात नवजात बालक जन्माला आले तर मुलाच्या जन्माच्या नोंदणीमध्ये पालकांच्या धर्माशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे. पालकांना ही माहिती स्वतंत्रपणे भरावी लागणार आहे. आतापर्यंतदेखील बालकाच्या जन्म नोंदणीवेळी कुटुंबाच्या धर्माची नोंद केली जात होती. पण केंद्र सरकारच्या यासंदर्भात प्रारुप नियमावली तयार केली आहे. गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना पाठवला आहे. त्यामुळे नव्या पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी लागणार आहे. यासाठी वेगळा कॉलम असणार आहे. त्या कॉलममध्ये तुम्हाला ही माहिती भरावी लागेल.


यात नवीन काय?

याआधी तुम्ही जन्माची नोंदणी केली असेल तर तुम्हाला फॉर्म क्रमांक 1 भरावा लागला असेल. त्यामध्ये तुम्हाला कुटुंबाच्या धर्मासाठी एक कॉलम होता. आता येथे तुम्हाला आणखी एक कॉलम दिसेल. यामध्ये मुलाच्या पालकांचा धर्म कोणता? हे विचारलं जाईल. ही माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. दत्तक प्रक्रियेसाठी फॉर्म क्रमांक 1 देखील आवश्यक असेतो गेल्या वर्षी जन्म-मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा पारित करण्यात आला. यामध्ये विशेष बदल पाहायला मिळाले. यानुसार राष्ट्रीय स्तरावरही जन्म-मृत्यूची नोंदणी आवश्यक असेल, याची नोंद घ्या. 

मुलाच्या जन्मावेळी डेटाबेस तयार

प्रत्येक मुलाच्या जन्मावेळी डेटाबेस तयार केला जाईल. यामध्ये बाळाच्या अनेक गोष्टींची नोद ठेवली जाईल. नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (NPR), आधार कार्ड, मतदार यादी, रेशन कार्ड, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स यासारखी कागदपत्रे भविष्यात आपल्याला काढावी लागतात. अशावेळी जन्म नोंदणीचा नवीन फॉर्म क्रमांक 1 महत्वाचा ठरेल. 

यामध्ये डेटाबेसच्या आधारे माहिती अपडेट होत राहीलं. मुलाच्या जन्माशी संबंधित हे डिजिटल प्रमाणपत्र असेल. हे एक महत्वाते कागदपत्र म्हणून वैध असेल. एवढेच नव्हे तर कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश घेताना जन्म प्रमाणपत्र म्हणूनही तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. 

जुन्या आजारांची द्या माहिती 

जन्म दाखल्यासोबत मृत्यू दाखलादेखील महत्वाचे दस्तावेज असते. हे दस्तावेज नसल्यासही इन्शुरन्स, घरचे कागदपत्र बनवताना अडचणी येतात. मृत्यू दाखल्यातही काही बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. यापुढे मृत्यू दाखला बनवताना मृत व्यक्तीला कोणता आजार होता का? याची माहिती भरावी लागणार आहे. 

भारताचे रजिस्ट्रार जनरल (RGI) यांनी यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत. यामध्ये जुन्या आजारांची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. भारताचे रजिस्ट्रार जनरल हे राष्ट्रीय स्तरावर देशभरातील जन्म आणि मृत्यूच्या डेटाची देखरेख करते.