Sangli Samachar

The Janshakti News

संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्याने सांगलीत घमासान, महाआघाडीत बिघाडी



सांगली समाचार - दि. ७ एप्रिल २०२४
सांगली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत उबाठा तर्फे पै. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर संजय राऊत हे मतदार संघाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने सांगलीत आले. इथे आल्यानंतर किंबहुना पूर्वीपासूनच राऊत याना सांगलीची राजकीय परिस्थिती ठाऊक होती. पण एका बड्या नेत्याकडून पाठिंबाचा शब्द मिळाल्याने उबाठाने चाल खेळली खरी, परंतु आता त्याचमुळे हा गट अडचणीत आला आहे.

सांगली दौऱ्यात आपल्या हाती काहीच लागत नाही म्हटल्यानंतर, आणि काँग्रेस नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये मध्यस्थी होऊ शकली नाही. अशातच महाराष्ट्रातील व महाआघाडीतील तगडे नेते शरद पवार यांनी शिवसेनेलाच खडे बोल सुनावले. या साऱ्यांचा परिणाम हातात आलेला डाव विस्कटू लागला. त्यामुळे संजय राऊत यांचा तोल ढळला आहे. त्यामुळे आता ज्यांच्या बरोबर मध्यस्थी करायची त्यांच्यावरच राऊत तोंडसुख घेऊ लागल्याने सांगलीत राजकीय परिस्थिती ची वेळच चालली आहे.


राऊत यांनी काल विटा खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यातून शिवसेनाप्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी झालेल्या बैठकीतून राऊत यांनी पेताळ वक्तव्य केली आहेत. परिणामी आता राज्यातील काँग्रेस नेते व सांगली जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते इरेस पेटले आहेत. जशास तसे उत्तर देत सांगलीच्या कार्यकर्त्यांनी 'हम भी कुछ कम नही' असा पवित्रा घेतला. दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप वाढू लागलेले, उबाठा- काँग्रेस समझोता एक्सप्रेस रुळावरून घसरली आहे. यापुढील दोन-तीन दिवस वातावरणातील उष्णतेबरोबरच सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण हे तापणार आहे. आता यातून त वरिष्ठ पातळीवरील नेते काय मार्ग काढतात ? कोणती भूमिका घेतात ? यावर महाआघाडीतील सामंजस्य टिकणार की बिघडणार हे दिसून येईल. तोपर्यंत "हाण की बडव" हा सिलसिला सुरूच राहणार आहे.