Sangli Samachar

The Janshakti News

चार जागांवरून मुख्यमंत्र्यांचा भाजपला ठाम निरोप, वेगळी भूमिका घेणार ?



सांगली समाचार- दि. २८ मार्च २०२४
मुंबई  - लोकसभेच्या चार जागांवरून महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत कमालीचा हाय-होल्टेज ड्रामा सुरू आहे. शिर्डी, ठाणे, दक्षिण मुंबई आणि नाशिक या जागांचा तिढा कायम राहिल्यास शिवसेना महायुतीत या चार मतदारसंघाबाबत वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चारही जागा मूळ शिवसेनेच्या आहेत. त्यामुळे भाजप या जागांबाबत परस्पर निर्णय घेऊन शकत नाही. या जागा शिवसेनाच लढवणार असल्याचा ठाम निरोप शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी कळवला आहे.

महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमध्ये  सध्या जागा वाटपावरून रणकंदन सुरू आहे. याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे, महायुतीत येऊ घातलेल्या मनसेच्या एन्ट्रीची! शिर्डी, ठाणे, दक्षिण मुंबई आणि नाशिक या चार जागा मूळ शिवसेनेकडे आहे. या चारही जागांवरून भाजपकडून शिवसेनेवर दबाव आणला जात आहे. परंतु, शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी या चारही जागा शिवसेनेकडेच राहतील, असा निरोप भाजपला पोहोचवला आहे. चारही मतदारसंघात शिवसेनेकडे निवडून येतील, अशी आवश्यक समीकरणे आहेत. या समीकरणांची मांडणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः भाजपसमोर मांडणी केली आहे. या चारही मतदारसंघातील शिवसेनेकडील इच्छुकांची नावे देखील एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे पाठवली आहेत.



राज्यात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अकोला (25 टक्के मतदान ), सांगली (25 टक्के मतदान ), सोलापूर (16 टक्के मतदान ), बुलडाणा (15 टक्के मतदान ), हिंगोली (15 टक्के मतदान ), नांदेड (15 टक्के मतदान ), परभणी (12 टक्के मतदान ), नाशिक (10 टक्के मतदान) , हातकणंगले (10 टक्के मतदान ), गडचिरोली - चिमुर (10 टक्के मतदान ) प्राप्त झाले होते. वंचितला झालेले हे लाखोंचे मतदान विजयी उमेदवाराच्या विजयासाठी आणि पराभूत उमेदवाराच्या पराभवासाठी नक्कीच कारणीभूत ठरले, तर राज्यातील चंद्रपूर आणि लातूर दोन मतदारसंघांत वंचितने 9 टक्के मते मिळवली होती, तर राज्यातील या पाच मतदारसंघांत वंचितची मते मोठ्या प्रमाणात निर्णायक ठरली. यात यवतमाळ- वाशीम, मुंबई दक्षिण मध्य, बीड, उस्मानाबाद आणि रावेर या प्रत्येक मतदारसंघांत वंचितला 8 टक्के मते मिळाली होती. याचा मोठा फायदा गेल्यावेळी भाजप शिवसेना युतीला झाला होता.

देशात इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी काँग्रेस ला दुय्यम स्थान दिले. इंडिया आघाडीत आत बाहेर करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला एकही जागा सोडली नाही. सर्वच्या सर्व 42 जागांवर निवडणूक लढविणार आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीने काँग्रेसला 80 पैकी केवळ 17 जागा दिल्या तर 63 जागांवर सपा निवडणूक लढविणार आहे. देशातील अशा राजकीय परिस्थितीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन प्रसंगी वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती लावली होती.

महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक जागांची अपेक्षा होती. ती मात्र शिवसेनेच्या अवाढव्य मागणीपुढे कमी ठरली. शिवसेनेला राज्यात 23 जागा पाहिजे आहे. त्यांचे उमेदवार आज उद्याकडे जाहीर होतील. त्यामुळे काँग्रेसला कमी जागांवर समाधान राज्यात मानावे लागेल. देशात सर्वत्र आघाडी, युतीचे निर्णय झाले असताना राज्यात पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघांत आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून दूसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू होत असताना महाविकास आघाडी व महायुतीचे चित्र अस्पष्ट आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्तावाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सन्मान करण्याची गरज व्यक्त केली होती. काँग्रेसला वंचितचा प्रस्ताव मान्य असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले होते पण, नेमका कोणता प्रस्ताव मान्य केला हे घोषित केले नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गेल्या आठवड्यात वंचितने राज्यातील सात जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा घोषित केला होता. अशा वेळी आज वंचित नेते प्रकाश आंबेडकर हे आज अकोला येथे 11 पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे. त्याच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारणाला विधानसभा निवडणूकपूर्व होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत कलाटणी देणारा निर्णय असेल, जो राज्यात राजकीय भूकंप निश्चित करेल.