सांगली समाचार - दि. २८ मार्च २०२४
मुंबई - भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत भाजपच्या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपच्या स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहार राज्याच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आल आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनाही मध्य प्रदेशसाठी स्टार प्रचारक म्हणून नेमण्यात आलं आहे. विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृती ईराणी आणि मनोज तिवारी यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.