Sangli Samachar

The Janshakti News

सांगली महापालिका क्षेत्रात विकास योजना सुरू करण्याची मागणी
सांगली समाचार  | मंगळवार दि. ०६ |०२|२०२४

सांगली - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री. अजित पवार यांना सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास योजना सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिक हक्क समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

सद्या  सांगलीची कृष्णा नदी वारंवार कोरडी पडत आहे त्याबाबत समन्वय साधुन नियोजन करण्यात आले होते मात्र त्या पद्धतीने कार्यवाही होत नाही त्यामुळे मनपा क्षेत्रातील पाणी पुरवठा वर परिणाम होत आहे मा.नाम.शंभुराजे देसाई यांच्या बरोबर चर्चा करून कृष्णा नदी कोरडी पडली नाही पाहिजे ह्या बाबतीत आदेश व्हावेत.

सांगली शहरातील कृष्णा नदीच्या दुषित पाण्यावर आतापर्यंत राजकारण झाले आहे. मात्र त्यावर उपाययोजना झाल्या नाहीत. शासन स्तरावर एच टी पी प्लांट (HTP PLANT) तांत्रिक मंजुरी मिळाली आहे अजुन प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी व त्यासाठी लागणारा निधी मंजुर करण्यात यावा. 

सांगली शहर पासुन  जवळ असणाऱ्या माधवनगर, बुधगाव गावातुन वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यासाठी डी पी प्लॅन मध्ये गेल्या कित्येक वर्षांपासुन प्रस्तावित असणार रिंग रोड विकसित करण्यासाठी भुमी अधिग्रहण सह रस्ता करण्यासाठी निधी मंजुर करण्यात यावा.

कवलापूर येथील  विमानतळ 1963 पासुन असताना देखील ते विकसित करण्यात आली नाही. सदर ठिकाणी महाराष्ट्र शासनाची 160 एकर जमीन उपलब्ध असून केंद्र सरकारच्या उडाण योजनेच्या यादीत कवलापुर विमानतळ चे नाव समाविष्ट आहे. स्वर्गीय आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर दादा गाडगीळ साहेबांची ह्या बाबतीत विशेष प्रयत्न केले आहेत मात्र त्या बाबतीत पुढील कार्यवाही साठी आपणा कडून संबंधितांना आदेश व्हावेत.

सांगली शहरातील महत्वाचा रिंग रोड छत्रपती शाहु महाराज रोड (100 फुटी रोड) राज्य सरकार कडे त्या बाबतीत प्रस्ताव प्रलंबित आहे, त्याला तात्काळ मंजुरी देण्यात यावी.

सांगली शहरातील विस्तारित भागा साठी ड्रेनेज योजनेचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकार कडे पाठवण्यासाठी मनपा आयुक्त यांना आदेश द्यावेत.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात डी पी रोड ची आरक्षित असलेल्या जागेवर गुंठेवारी करून मोठ्या प्रमाणात प्लॉट पाडण्यात येत आहेत त्याला आळा घालण्यासाठी मनपा आयुक्त यांना आदेश द्यावेत. 

सध्या सांगलीची कृष्णा नदी वारंवार कोरडी पडत आहे त्याबाबत समन्वय साधुन नियोजन करण्यात आले होते मात्र त्या पद्धतीने कार्यवाही होत नाही त्यामुळे मनपा क्षेत्रातील पाणी पुरवठा वर परिणाम होत आहे ना. शंभुराजे देसाई यांच्या बरोबर चर्चा करून कृष्णा नदी कोरडी पडली नाही पाहिजे ह्या बाबतीत आदेश व्हावेत.

सांगली शहरातील कृष्णा नदीच्या दुषित पाण्यावर आता पर्यंत राजकारण झाले आहे. मात्र त्यावर उपयोजना झाल्या नाहीत, शासन स्तरावर एच टी पी प्लांट (HTP PLANT) तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. मात्र अजून प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही. त्यासाठी लागणारा निधी मंजुर करण्यात यावा. 

सांगली आणि मिरज शहरांना जोडणारा नवीन रस्ता आवश्यक असताना देखील त्या बाबतीत उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. मनपाची आर्थिक परिस्थिती पाहता भूमी अधिग्रहण करून रस्ता करणे शक्य नाही, तरी राज्य सरकारकडून ह्या बाबतीत भूमी अधिग्रहणासह रस्ता करण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा.

कवलापुर विमानतळ 1963 पासून असताना देखील ते विकसित करण्यात आले नाही सदर ठिकाणी महाराष्ट्र शासनाची 160 एकर जमीन उपलब्ध असून केंद्र सरकारच्या उडाण योजनेच्या यादीत कवलापूर विमानतळाचे नाव आहे स्वर्गीय आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर दादा गाडगीळ साहेबांची ह्या बाबतीत विशेष प्रयत्न केले आहेत. मात्र त्या बाबतीत पुढील कार्यवाहीसाठी संबंधितांना आदेश द्यावेत.

सांगली शहरातील महत्वाचा रिंग रोड छत्रपती शाहु महाराज रोड (100 फुटी रोड) राज्य सरकार कडे वर्ग करण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे, त्याला तात्काळ मंजुरी देण्यात यावी.

सांगली शहरातील विस्तारित भागा साठी ड्रेनेज योजनेचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकार कडे पाठवण्यासाठी मनपा आयुक्त यांना आदेश द्यावेत.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात डी. पी. रोडसाठी आरक्षित असलेल्या जागेवर, गुंठेवारी करून मोठ्या प्रमाणात प्लॉट पाडण्यात येत आहेत त्याला आळा घालण्यासाठी मनपा आयुक्त यांना आदेश द्यावेत.  तसेच महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता, सदर रस्ते विकसित करण्यासाठी व अधिग्रहण करण्यासाठी निधी उपलब्ध करून  द्यावा.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामाच्या बाबतीत मंत्रालयात स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची व्यापक मीटिंग घेण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी सतीश साखळकर यांच्या समवेत, गजानन साळुंखे, तानाजी सरगर, पैलवान प्रमोद पाटील, आनंद देसाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.