Sangli Samachar

The Janshakti News

प्रथम परवानाधारक खोल्यांचे पुनर्वसन करा - गणेश कोडते
सांगली समाचार | मंगळवार दि. ०६ |०२|२०२४

सांगली - सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिकेमार्फत विनापरवाना खोक्यांची अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू आहे. महापालिकेने प्रथम या खोकीधारकांचे पुनर्वसन करावे आणि मगच ही मोहीम सुरू करावी अशी मागणी सांगली स्टेशन चौकातील गणेश मार्केटचे अध्यक्ष गणेश कोडते यांनी केली आहे.

सध्या १०० फुटी रोड, कोल्हापूर रोड, सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील विनापरवाना खोकी हटविण्याचे काम महापालिका उपायुक्तांनी सुरू केली आहे. तसेच परवानाधारक पण नियमानुसार नसलेल्या खोकी हटविण्यात येत आहेत. हे काम कायद्यास धरून व योग्यच आहे. परंतु जेवढ्या तत्परतेने खोकी काढण्याची कारवाई करण्यात येत आहे, तेवढ्याच तत्परतेने पुनर्वसन करण्यात यावे, तसेच जे परवानाधारक आहेत, त्यांना योग्य त्या ठिकाणी आर. सी. सी. पक्क्या गाळ्यात त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करावेअसे कोडते यानी म्हटले आहे.

ज्यावेळी खोके अधिकृत आहे की नाही हे उपायुक्त पहात असतात. तेव्हा तेथील खोक्यावर नंबर असेल, पण खोकीधारक उपस्थित नसेल तर अशी खोकी हटविण्यात येऊ नयेत, अशी मागणीही कोडते यांनी केली आहे.