| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. ७ ऑगस्ट २०२५
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत मंजुर डिपीआर १०२ मधील लाभार्थ्यांकरीता विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे मा आयुक्त यांनी दिल्या आदेशानुसार सदरचे आयोजन करण्यात येत आहे
मा. प्रधानमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील "सर्वासाठी घरे" अंतर्गत केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेला १० वर्षे पूर्ण झाली असल्याने, या योजनेची दशकपूर्तीच्या अनुषंगाने व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० या योजनेची १ वर्षे प्रतिपुर्तीच्या अनुषंगाने दिनांक १५ सप्टेंबर, २०२५ रोजी मा. मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते घराच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्याच दिवशी सदर कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच दिवशी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत मंजूर १०,००० पेक्षा अधिक घरांच्या पायाभरणीचा कार्यक्रम त्या त्या जिल्हयात महानगरपालिकेने आयोजित करणेसाठी BLC घटकांतर्गत मंजूर घरांसाठी बांधकाम परवानगी सह सर्व वैधानिक मंजूऱ्या १०० % पूर्ण करण्यात याव्यात, जेणेकरून एकाच दिवशी १०,००० पेक्षा अधिक घरांच्या पायाभरणी करण्याचे लक्ष साध्य करण्याबाबत सुचना गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून देण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासकसो सत्यम गांधी यांनी दिलेल्या सुचनानुसार सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांचे बांधकाम परवाने अर्ज दाखल करुन घेणे व अर्जाची छाननी करणे आणि त्रूटी पुर्तता करुन बांधकाम परवाने देणेकरीता खालील प्रमाणे कार्यशाळेचे आयोजन करणेत येत आहे.
त्यानुसार सोमवार १८ ऑगस्ट रोजी डॉ. वसंतदादा पाटील सभागृह महानगरपालिका मुख्यालय इमारत, सांगली, मंगळवार १९ ऑगस्ट रोजी विभागीय कार्यालय सभागृह, महानगरपालिका इमारत मिरज आणि बुधवार २० ऑगस्ट रोजी विभागीय कार्यालय सभागृह, महानगरपालिका इमारत कुपावाड येथे सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित केली आहे. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील अधिकारी आणि नगररचना विभागातील संबधित अधिकारी उपस्थित राहुन प्रधानमंत्री आवास योजना २.० मधील मंजूर लाभार्थ्यांचे बांधकाम ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे छाणनी करणे, झोन दाखले देणे इ. त्रूटी पुर्तता करुन घेणे व मार्गदर्शन करणेकरीता उपस्थित राहणार आहेत.
प्रधानमंत्री आवास २.० योजनेतील मंजूर डिपीआर १०२ मधील ज्या लाभार्थ्यांनी आपले घरकुल मंजुर झाल्याचे पत्र महानगरपालिकेतून घेतलेले नाही, अशा लाभार्थ्यांनी सदरचे घरकुल मंजुरीचे पत्र प्रधानमंत्री आवास योजना कक्ष, महानगरपालिका मुख्यालय इमारत, सांगली येथून घ्यावे, यासाठी समाज विकास तज्ञ सागर शिंदे यांचेशी संपर्क करावा. तसेच ज्या लाभार्थ्यांनी अद्याप बांधकाम परवाना काढलेला नाही अशा लाभार्थ्यांनी वरील प्रमाणे घरकुल मंजुरीचे पत्र आणि आवश्यक सर्व कागदपत्रासह आपल्या संबधीत विभागीय कार्यालयामध्ये दिलेल्या वेळेत उपस्थित राहुन बांधकाम परवाना संबंधी पुर्तता करणेची आहे. आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांच्ये बांधकाम परवाने दि.१० सप्टेंबर, २०२५ पुर्वी देणेकरीता विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी यावेळी दिली आहे.