yuva MAharashtra थकीत कर न भरल्यास थकबाकी धारकांच्या मालमत्ता जप्त होणार, थकबाकीधारकांवर महानगरपालिकेची धडक जप्ती मोहिम

थकीत कर न भरल्यास थकबाकी धारकांच्या मालमत्ता जप्त होणार, थकबाकीधारकांवर महानगरपालिकेची धडक जप्ती मोहिम

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. ६ ऑगस्ट २०२५

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील थकबाकीदार मालमत्ताधारका विरोधात मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहिम राबविण्यात येत आहे. मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून, वेळोवेळी नोटीस देऊनही काही नागरिकांनी कर भरण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे प्रशासनाने थेट जप्तीची कठोर कारवाई हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महानगरपालिकेकडे आज रोजी एकूण थकबाकीची रक्कम 94 कोटी इतकी असून त्याचे वसूलीचे प्रमाण कमी आहे. याकरीता महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार, दिनांक 06/08/2025 पासून संबंधित थकबाकीदारांवर खालीलप्रमाणे कारवाई केली जाणार आहे. कर भरण्यास दिलेल्या मुदतीनंतर मालमत्ता जप्त करणे. आवश्यक असल्यास जप्त मालमत्ता लिलाव प्रक्रियेत आणणे. पाणीपुरवठा, व इतर नागरी सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद करणे. थकबाकीधारकांची यादी वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द करणेत येईल.
   
आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये तब्बल ५०००० वरील थकबाकी असलेल्या 2095 इतक्या मिळकत धारकांना जप्ती पूर्व नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत तसेच 5000 वरील थकबाकी असलेल्या 34 हजार 195 इतक्या मालमत्ता धारकांना जप्ती पूर्व नोटीस वाटप करण्याचे काम चालू आहे तसेच जप्ती व वसुली करणे कामी सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले असून भाग निहाय जप्ती व पथके नेमण्यात आलेली आहे.

जप्ती व वसुली करण्याकामी मालमत्ता कर विभागाकडून सुक्ष्म नियोजन करण्यात आलेले असून भाग निहाय जप्ती व वसुली पथके नेमण्यात आलेली आहेत. त्यामुळे ही जप्तीची अप्रिय कार्यवाही नागरीकांनी टाळावी" असे आवाहन श्री. नीलेश देशमुख - अति आयुक्त. 
  
"महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने नागरी सेवा आणि विकास कामांवर परिणाम होत आहे त्यामुळे जप्तीची कार्यवाही अपरिहार्य झालेली आहे. थकबाकीदार मिळकतीधारकांनी त्वरीत आपली थकबाकी रक्कम भरुन महानगरपलिकेच्या अप्रिय अशा जप्ती मोहिमेपासुन वाचावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे." असे श्री. सत्यम गांधी , आयुक्त यांनी अहवान केले आहे.