yuva MAharashtra 'हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता' मोहिमेस मनपाच्या क्षेत्रात प्रारंभ, मोहिमेत सक्रिय सहभाग घ्या - आयुक्त मा सत्यम गांधी

'हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता' मोहिमेस मनपाच्या क्षेत्रात प्रारंभ, मोहिमेत सक्रिय सहभाग घ्या - आयुक्त मा सत्यम गांधी

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. ९ ऑगस्ट २०२५

 "स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग' अंतर्गत स्वातंत्र्य दिनानिमित 'हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता' ही मोहीम ८ ते १५ ऑगस्ट या कालावधीत सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणार आहे," अशी माहिती हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता' नोडल अधिकारी तथा अति आयुक्त राहुल रोकडे यांनी दिली.

या मोहिमेचा प्रारंभ सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात करण्यात आला.
 'स्वच्छता ही सेवा अंतर्गत' परिसर स्वच्छता करणे बाबत प्रतिज्ञा नागरिक, कर्मचारी अधिकारी आणि विद्यार्थ्यांना देण्यात देण्यात येणार आहे.

 या मोहिमेची संकल्पना लोकसहभागातून उत्सव व नागरी एकतेच्या भावनेवर आधारित आहे. या मोहिमेच्या दरम्यान सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणे, कार्यालय अन्य सुविधांची स्वच्छता केली जाणारआहे.

संस्था, NGO, विद्यार्थी व युवक यांच्या स्वच्छता रॅली, वैयक्तिक घरांमध्ये रांगोळी व रंगकाम, नाल्यांची स्वच्छता, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन असे उपक्रम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणे व रस्त्यांची साफसफाई केली जाणार आहे. 

 
या मोहिमेत स्वच्छता संवाद वा जागरुकता दिन साजरा करण्यात येणार आहे. विविध उपक्रमात नागरिकांनी सहभागी नोंदवावा ,आपला तिरंगा सोबत सेल्फी काढून मनपाच्या देऊन सदरच्या उसत्व साजरा करावा . #Har Ghar Tiranga 2025# Har Ghar Tiranga, या वेबसाईटवर वर आपली सेल्फी शेअर करून सहकार्य करावे .

'स्वच्छतावीर सन्मान'

"स्वातंत्र्य दिनी स्वच्छता वीर व स्वयंसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.