yuva MAharashtra कॉंग्रेस सेनादलाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा, अलमट्टी उंचीवाढीस व शक्तीपीठ महामार्गास विरोध

कॉंग्रेस सेनादलाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा, अलमट्टी उंचीवाढीस व शक्तीपीठ महामार्गास विरोध

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. ८ जुलै २०२५

सांगली जिल्हा व शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलच्या संघटनेची बैठक आज काँग्रेस भवन सांगली येथे दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली होती यावेळी सदर बैठकीमध्ये शक्तिपीठ महामार्गास विरोध शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या थकीत पगार ताबडतोब त्यांच्या खात्यावर जमा करणे संदर्भात माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना माननीय जिल्हा अधिकारी सांगली यांना निवेदन देण्याचे ठरवण्यात आले.

तसेच पुढील आठवड्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणूक संदर्भात चर्चा करण्यासाठी एक व्यापक बैठक घेण्यात यावे असे ठरले. मिरज तालुका अध्यक्ष श्री संगाप्पा पाटोळे व प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम माळी यांनी संघटनेच्यापुढील वाटचाली संदर्भात मार्गदर्शन केले. 

यावेळी स्वागत व प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष अशोक सिंग रजपूत व शेवटी आभार जिल्हाध्यक्ष अण्णासो खोत यांनी मांडले.

यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, प्रदेश ओबीसी चे डॉक्टर विवेक गुरव, गजानन मिरजे, सौ. सुनीता मदने, अरुण गवंडी, अनिल मोहिते, विठ्ठलराव काळे, जिल्हा सचिव सचिन चव्हाण, विश्वास यादव, लालसाब तांबोळी, संजय खिलारे, विष्णू मोरे, मंथन माळी इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.