| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शुक्रवार दि. १८ जुलै २०२५
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, एक ऐतिहासिक आणि जनभावनांना न्याय देणारा निर्णय आज सभागृहात जाहीर झाला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाने या निर्णयाला हिरवा कंदील दिला असून, आता प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे.
दशकांपासून रुजलेली मागणी
इस्लामपूर या शहराच्या नामांतराची मागणी ही कुठलीतरी अलिकडची राजकीय हालचाल नाही, तर ती गेली चार-पाच दशके या भागात जनमानसात रेंगाळत होती. 1970 च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक कार्यकर्ते पंत सबनीस यांनी या बदलाची पहिली ठोस मागणी केली होती. इस्लामपूरचे नाव ‘ईश्वरपूर’ असावे, यामागे धार्मिक समन्वय, स्थानिक भावनांचा आदर आणि संस्कृतीशी असलेली नाळ जपण्याचा हेतू होता.
बाळासाहेब ठाकरेंची ऐतिहासिक घोषणाया मागणीला मोठा राजकीय पाठिंबा मिळाला तो 1986 मध्ये, जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे इस्लामपूरमध्ये एका जाहीर सभेसाठी आले होते. यल्लमा चौकात झालेल्या त्या ऐतिहासिक सभेत त्यांनी पहिल्यांदा सार्वजनिकपणे इस्लामपूरचा उल्लेख 'ईश्वरपूर' असा केला होता. त्यावेळी त्यांनी स्थानिक संस्कृती आणि धार्मिक समरसतेच्या आधारे नामांतराची भूमिका स्पष्ट मांडली होती. ही घटना इस्लामपूरच्या नामांतराच्या चळवळीत मैलाचा दगड ठरली.शिवप्रतिष्ठान नामांतरासाठी आग्रहीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वेसर्वा संभाजीराव भिडे गुरुजी यांनीही इस्लामपूरच्या नामांतरासाठी सातत्यपूर्ण मागणी केली होती. ते स्वतः व त्यांचे धारावी हे सदैव इस्लामपूरचा उल्लेख इस्लामपूर असाच करीत असायचे. ही मागणीही आता पूर्णत्वास गेली आहे.
शासन निर्णयाच्या उंबरठ्यावर
आज छगन भुजबळ यांनी विधिमंडळात दिलेल्या घोषणेमुळे या मागणीला औपचारिक मान्यता मिळाली आहे. मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर, आता केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यावर इस्लामपूर हे नाव इतिहासजमा होऊन 'ईश्वरपूर' हे नवसंजीवनी मिळालेलं नाव म्हणून प्रस्थापित होणार आहे.
एकदा केंद्राकडून मान्यता मिळाल्यानंतर, शहराचा सर्व शासकीय आणि प्रशासकीय स्तरांवर 'ईश्वरपूर' असा उल्लेख केला जाईल. यामध्ये नगरपरिषद, विधानसभा मतदारसंघ, महसूल विभाग, शैक्षणिक संस्था, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्र अशा सर्व ठिकाणी हे नवं नाव वापरात येईल.
सामाजिक-सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण पाऊल
हे नामांतर फक्त एका शहराच्या नावाचा बदल नाही, तर ते स्थानिक लोकांच्या भावनांचा, सांस्कृतिक ओळखीचा आणि ऐतिहासिक मागणीचा सन्मान आहे. बदलती सामाजिक जाणीव, आणि इतिहासाशी जोडलेली नाळ पुन्हा अधोरेखित करत, इस्लामपूरचे 'ईश्वरपूर'मध्ये रूपांतर ही घटना एक वैचारिक व सांस्कृतिक टप्पा मानली जात आहे.