| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. १८ जुलै २०२५
मा रविकांत अडसूळ अति आयुक्त यांची कोल्हापूर मनपा मध्ये अति आयुक्त पदी यांची बदली झाल्याने त्यांना भावपूर्ण निरोप, तर मा राहुल रोकडे अति आयुक्त यांची कोल्हापूरहून सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका मध्ये अति आयुक्त म्हणून बदली झाल्याने त्यांचे ह्रद्य स्वागत असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
स्थायी समिती सभागृहात सर्व कर्मचारी अधिकारी यांनी आयोजित निरोप समारंभात, नकुल जकाते यांनी प्रास्ताविक करून मनोगत व्यक्त केले. शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की अति आयुक्त म्हणून काम करताना श्री अडसूळ साहेब यांनी बराच बाबी बारकाईने अभ्यास करून मनपाच्या हिताच्या नमूद केल्याने चागले काम करता आले आहे.
माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी या वेळी बोलताना श्री अडसूळ साहेब याचे काही अनुभव सांगून मनपाच्या हिताच्यादृष्टीने असे अधिकारी मनपात असणे आवश्यक आहे असे नमूद केले. चांगले अधिकारी मनपात येतात आणि चागले काम करून जातात त्यामध्ये अडसूळसो आहेत, असे ते म्हणाले.
श्री अडसूळ यांच्या अनुभव आणि नेहमी मनपाच्या हिताचे धोरण यामुळे मनपास लाभ झाला आहे.
उप आयुक्त अश्विनी पाटील, उप आयुक्त विजया यादव यांनी श्री अडसूळसो यांनी सर्व अधिकारी यांना चांगले मार्गदर्शन केले आहे, प्रशासनात समनव्याने कामकाज केल्याने , परिणाम म्हणून मनपाच्या कामकाजात सुधारणा झाली आहे, असे या वेळी सांगितले. सुनील माळी अग्निशमन अधिकारी, वृषाली अभंयकर यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या.
मा रविकांत अडसूळ अति आयुक्त यांनी या वेळी बोलताना सांगितले की, कामकाजाच्या काळात मला सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका बराच गोष्टी शिकायला मिळाला आहेत. शुभम गुप्ता आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली पूर परिस्थितीत चागले काम करता आले, कोणतीही हानी न होता नागरिकांना सुरक्षित स्थलांतरित करता आले, सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या समनव्य खूप चांगला असल्याने चागले काम करणे शक्य झाले आहे.
आयुक्त पदाचा काही काळ चार्ज होता त्यामध्ये देखील चांगले काम करता आले, सामान्य नागरिकांचे काम करताना आनंद झाला.
मा सत्यम गांधी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी संवाद यामुळे तक्रारी प्रमाण कमी होऊन नागरिकाच्या मनपा प्रशासनाच्या बदल विश्वास निर्माण करता आला, कार्यभारात मनपाचे हित पाहून काम केले आहे. आपल्या भावपूर्ण निरोप समारंभाबाबत श्री अडसूळ यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी सहा आयुक्त नकुल जकाते, सचिन सागावकर, अनिस मुल्ला, मालमता अधीक्षक धनंजय हर्षद, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.