| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. १० जुलै २०२५
सांगलीच्या विद्यानगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मागील महिनाभरापासून बंद असलेल्या न्यायाधीशांच्या बंगल्यात चोरट्यांनी घुसखोरी करत रोख रक्कम व महत्वाच्या वस्तू लंपास केल्या.
या प्रकरणी विश्रामबाग परिसरातील पांडुरंग विष्णु भंडारी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या शेजारी राहणारे न्यायाधीश अमोल भारत जवळे यांचा 'आराध्य' नावाचा बंगला गेल्या काही दिवसांपासून बंद होता. या काळातच चोरट्यांनी संधी साधून बंगल्याचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला.
बंगल्याच्या कपाटातील सुमारे सहा हजार रुपये रोख आणि बँकेतील तिजोरीच्या चाव्या तसेच इतर काही साहित्य चोरट्यांनी चोरण्यात यश मिळवले. ही घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.