| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. २५ जुलै २०२५
मा सत्यम गांधी आयुक्त यांनी मनपाच्या शाळा दुरुस्ती बाबत लक्ष घालून सर्व शाळांची तपासणी करून दुरुस्ती बाबत आदेश दिले आहेत. सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या मालकीच्याच एकूण 39 शाळेच्या दुरुस्तीची रक्कम रुपये 475.52 लक्ष इतक्या रकमेची कामे मंजूर करण्यात आलेले आहेत. सदर कामांमध्ये शाळेची गंळती प्रतिबंध व्यवस्था. शाळेतील शौचालयाची दुरुस्ती व आवश्यक त्या ठिकाणी नवीन शौचालय व शाळेच्या फरशी दुरुस्ती , शाळेचे रंगकाम, क्रीडांगण सुधारणा इत्यादी कामाचा समावेश आहे.
सांगली येथील व मिरज येथील शाळा नंबर 17, 26 23, 29 व मिरज येथील शाळा नंबर 19, 22 या शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या या निर्णयामुळे महापालिकेच्या ज्या शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या होत्या, तेथील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून आयुक्तांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.