| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - शुक्रवार दि. २५ जुलै २०२५
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या खासगीकरणाच्या प्रक्रियेला नव्या गतीने चालना मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून सध्या आठ महत्त्वाच्या सरकारी कंपन्यांच्या विक्रीची तयारी सुरू आहे. यामध्ये बीईएमएल लिमिटेड, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एचएलएल लाइफकेअर लिमिटेड, प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया आणि इंडियन मेडिसिन्स फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे.
दरम्यान, आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाची प्रक्रिया डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उर्वरित कंपन्यांची निर्गुंतवणूकही चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत म्हणजेच Q4 मध्ये पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारच्या या हालचालींमुळे देशातील खासगी गुंतवणुकीला चालना मिळण्याबरोबरच वित्तीय संसाधनांचा कार्यक्षम वापर होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.