yuva MAharashtra राज्यातील सर्व शाळांना वितरण होणाऱ्या गुलजार आत्तार यांच्या ललित बंध पुस्तकाचे प्रकाशन

राज्यातील सर्व शाळांना वितरण होणाऱ्या गुलजार आत्तार यांच्या ललित बंध पुस्तकाचे प्रकाशन

| सांगली समाचार वृत्त |
वाळवा - गुरुवार दि. १० जुलै २०२५

सुरूल (ता. वाळवा) येथील श्री माणकेश्वर विद्यालयाच्या शिक्षिका सौ. गुलजार आत्तार यांच्या ललित बंध पुस्तकाची समग्र शिक्षा अंतर्गत ग्रंथालय उपक्रम सन 2024/25 साठी राज्यस्तरावर निवड करण्यात आली होती. या पुस्तकाची शासनामार्फत छपाई झाली असून नुकतेच राज्याच्या सर्व शाळांमध्ये ते वितरित करण्यात आले आहे. 

 समग्र शिक्षा आणि PM SHRI अंतर्गत ग्रंथालय उपक्रम सन 2024-25 साठी राज्यातील सर्व जिल्ह्यातून राज्यस्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी यांनी लिहिलेली निवडक पुस्तकांची गुणवत्ता तपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत या पुस्तकांची छपाई करण्यात आली आहे.

 सौ गुलजार आत्तार यांनी सहा ते आठ स्तरासाठी लिहिलेल्या ललित बंध पुस्तकाची निवड, शासनामार्फत छपाई आणि राज्यातील सर्व शाळांना केलेले वितरण यामुळे सौ गुलजार आतार व त्यांची श्री माणकेश्वर विद्यालय सुरुल ही शाळा राज्याच्या शैक्षणिक नकाशावर उमटली आहे.

बातमी सौजन्य : चंद्रकांत राजाराम क्षीरसागर