yuva MAharashtra जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे - अजित ढोले

जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे - अजित ढोले

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - सोमवार दि. २१ जुलै २०२५

जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहन रावजी कदम यांच्या आशीर्वादाने व राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ विश्वजीत कदम उर्फ बाळासाहेब व जिल्ह्याचे खासदार विशाल दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा परिषद व कडेगाव तालुक्याचे नेते शांताराम बापू कदम व युवा नेते जितेश भैया कदम यांच्या मार्गदर्शनाने कडेगाव पंचायत समिती वरकाँग्रेस पक्षाची सत्ता आणण्यासाठी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी पक्षांनी जे उमेदवार देईल त्याला विजयी करण्यासाठी अहोरात्र झटून मतदारापर्यंत काँग्रेसचा विचार पोहोचवावे असे आवाहन सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केले.

सांगली जिल्हा काँग्रेससेवा दलाच्या आदेशानुसार, कडेगाव तालुका काँग्रेस सेवा दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले  होते. सदर बैठकीत  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक, गाव तेथे सेवादल, नवीन कार्यकारणी सदस्य निवड करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा सेवा दलाच्या संघटक सचिवपदी नेवरीचे योगेश महाडिक यांच्या निवडीचे पत्र शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिल जी मोहिते यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष व कडेगाव तालुका सदस्य पदी राहुल मोहिते यांच्या निवडीचे पत्रकार्याध्यक्ष सुरेश आप्पा घारगे यांचे प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी स्वागत प्रास्ताविक कडेगाव तालुकाध्यक्ष अजित कारंडे व शेवटी आभार जयराम मोरे यांनी मांनले सदर बैठकीमध्ये विविध प्रश्नावर योगेश महाडिक सुरेश घारगे महिला अध्यक्षा सौ नयना शिंदे, सौ सुनीता काकडे, रमेश रासकर यांनी  मनोगते व्यक्त केले. 

शहर जिल्हा सेवा दलाचे अनिल मोहिते यांनी भाजप सरकारच्या या अकरा वर्षांमध्ये गोरगरिबांना जगणे मुश्किल झाले आहे, वाढती महागाई महिला वरील अत्याचार युवकांची बेरोजगारी इत्यादी प्रश्नावली लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी गांधी, लालबहादूर शास्त्री, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने अनेक योजना राबविल्या व देशाला स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनवले. परंतु आजचे हे सरकार राष्ट्रीय संपत्ती ठराविक लोकांच्या घशाखाली घालून देशाला कंगाल बनवीत आहे सेवादलाने EVM च्या विरोधात आवाज उठवून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावेत  यासाठी आंदोलन उभे करावे असे सांगितले यावेळी कडेगाव तालुका सेवा दलाचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी  बहुसंख्येने उपस्थित होते.