| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. २३ जुलै २०२५
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात मा. सत्यम गांधी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अति आयुक्त निलेश देशमुख, अति आयुक्त राहुल रोकडे, उप आयुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत सर्व खाते प्रमुख यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
गणेश आगमन आणि गणेश विसर्जन या बाबत सर्व तयारी करण्यात येत आहे, कृष्णा नदी, कृत्रिम कुंड आणि शेत तळे, विहीर यांच्या मध्ये गणेश विसर्जन बाबत नियोजन करण्यात येत आहे.
प्रभाग समिती निहाय नियोजन करण्यात येणार असून, गणेश आगमन मार्गावरील रस्ते , विसर्जन मिरवणूक रस्ते या बाबत शहर अभियंता यांनी पाहणी करून सत्वर अहवाल देण्याचे आहे, मिरवणूक रस्ते चांगले असले पाहिजे सर्व खड्डे भरून घेण्याचे आहेत.
या वेळी शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, सहा आयुक्त अनिस मुल्ला, सचिन सागावकर, सहदेव कावडे, डॉ वैभव पाटील, नगररचनकार वैभव वाघमारे, मालमता अधीक्षक धनंजय हर्षद, सामान्य प्रशासन अधीक्षक अशोक माणकापुरे , डॉ रवींद्र ताटे, अमर चव्हाण कार्य अभियंता, अजित गुजराती पर्यावरण अभियंता, कायदा विभाग प्रमुख समीर जमादार, इत्यादी उपस्थितीत होते.