| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. ८ जून २०२५
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांनी 'एक तास राष्ट्रवादीसाठी - आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी - प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी' या उपक्रमाची संकल्पना मांडली होती. या करिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी,संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वानी बैठकीला उपस्थित राहुन, या बैठकीमध्ये, देशाच्या,राज्याच्या जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, सामाजिक,आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.
या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहरजिल्ह्याच्यावतीने सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या सुचनेनुसार आज एक तास राष्ट्रवादीची ३९ वी बैठक पक्षाच्या जिल्हा कार्यालय याठिकाणी पार पडली.
यावेळी राष्ट्रवादी सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहरजिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत बैठकीचे स्वरूप स्पष्ट केले तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी बूथ कमिट्या सक्षम करून बूथचे शहरजिल्हाध्यक्ष डॉ.शुभम जाधव यांच्याकडे आढावा देण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी बैठकीत बोलताना सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेबांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी येणाऱ्या काळात महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय पक्षाच्यावतीने संपर्क अभियान राबवून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिन येत्या १० जुन रोजी होणार आहे तरी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहाने आणि विविध कार्यक्रामाचे आयोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आली.
पक्षाचे शहरजिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी प्रभागातील नागरिक समस्याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत प्रशासनाला निवेदन देऊन प्रसंगी आंदोलनाचा पवित्रा घेत आक्रमक भूमिका घेण्यात यावी असे आवाहन केले. तसेच यावेळी पक्षाच्या बैठकीत राज्यात होणाऱ्या हुंडाबळीच्या घटनेबाबत चिंतन करण्यात आले. जिल्हात एकाही लेकीचा हुंडाबळी होणार नाही याबाबत पक्षाच्यावतीने लवकरच कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे.
हुंडाबळीच्याबाबत कोणाची तक्रार असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीशी संपर्क करण्यात यावे असे आवाहन पक्षाच्या सांगली महिला शहराध्यक्षा वैशाली धुमाळ यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेले २५ वर्ष महाआरोग्य शिबीर अविरत राबवण्यात येत आहे या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना विविध आरोग्य सेवा सुविधा दिल्या जातात त्याचाच एक भाग म्हणून आज पक्षाचे शरदचंद्र आरोग्य संजीवनी मित्रचे जिल्हाध्यक्ष तथा आरोग्य दूत उमर गवंडी यांच्या माध्यमातून कवठेपिरान येथील रुग्णास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामधून एक लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याचे पत्र आज शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेबांच्या हस्ते देण्यात आले. पक्षाचे युवक शहरजिल्हा कार्याध्यक्ष संदीप व्हणमाने यांनी बैठकीत आभार व्यक्त करत एक तास राष्ट्रवादीची ३९ वी बैठक संपन्न झाली.
यावेळी शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज ,हरिदास पाटील,तानाजी गडदे, अभिजीत भोसले ,महालिंग हेगडे, डॉ शुभम जाधव, वैशाली धुमाळ ,डॉ छाया जाधव ,अनिता पांगम,उमर गवंडी ,संदीप व्हनमाने,संगिता जाधव, सुरेखा सातपुते,छाया पांढरे, अरुण चव्हाण ,शितल खाडे, प्रणवी पाटील, स्नेहा सुतार, आकाराम कोळेकर,प्रकाश सूर्यवंशी, चंद्रकांत नाईक , दत्ता पाटील , राहुल यमगर, विश्वास लोंढे, सुरेश वडर आदी पदाधिकारी उपस्थित होते