| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. २९ जून २०२५
सांगली शहरातील वारणाली परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकास सायबर गुन्हेगारांनी भामट्यांनी मोठ्या चलाखीने फसवले. मोबाइलवर आलेल्या ‘ओटीपी’चा गैरवापर करत त्यांच्या दोन खात्यांमधून तब्बल आठ लाखांहून अधिक रक्कम गायब करण्यात आली.
७२ वर्षीय व्यापारी यांच्या मोबाइलवर एप्रिल महिन्यात संशयास्पद ‘ओटीपी’ क्रमांक आला. अनोळखी व्यक्तीने त्याचा फायदा घेत, त्यांच्या सेव्हिंग आणि करंट बँक खात्यांवर अघोषित प्रवेश मिळवला आणि काही तासांतच संपूर्ण रक्कम काढून घेतली. या प्रकरणात वृद्ध व्यापाऱ्याला खडबडून जाग आली तेव्हा त्यांच्या खात्यातील पैसे नाहीसे झाल्याचे लक्षात आले.
संबंधित बँकेत चौकशी केली असता, कोणत्या खात्यात पैसे गेले याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी संजयनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
या गंभीर आर्थिक फसवणुकीची नोंद संबंधित सायबर कायद्यांतर्गत व भारतीय दंड संहितेतील नव्या कलमान्वये करण्यात आली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.