| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. २९ जून २०२५
असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडियाच्या काल झालेल्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा कार्यकारणी निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून मारुती नवलाई, उपाध्यक्ष अनिल आपटे ,सचिव सलमान आमीन, संचालक जे वाय पाटील, अरुण मगदूम, महिला प्रतिनिधी शाहीन मुल्ला यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या निवडीवेळी मा. आप्पासाहेब पाटील, रंगराव शिंपूकडे, ए आय मुजावर, शशिकांत कुंभोजकर, सामाजिक कार्यकर्ते इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांचे या निवडीमुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मारुती नवलाई हे वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे पदाधिकारी म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला आहे. आता असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून दैनिके व साप्ताहिकांच्या समस्या सोडविण्यात मोलाची कामगिरी बजावतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.