yuva MAharashtra सोनिया गांधी सिमल्यातील रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर

सोनिया गांधी सिमल्यातील रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. ८ जून २०२५ 

कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना सिमल्यातील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज (IGMC) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुट्टीसाठी त्या सिमल्याला गेल्या होत्या आणि जवळच असलेल्या मुलगी प्रियंका गांधी यांच्या निवासस्थानी थांबल्या होत्या.


शनिवारी दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने IGMC रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून, तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले तरी, आवश्यकता भासल्यास त्यांना विशेष विमानाने दिल्लीतील रुग्णालयात हलविण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.