| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ मे २०२५
लोकराजा छ. शाहू महाराज यांच्या १०३ व्या पुण्यतिथीनिमित्त व पंडीत मोतीलाल नेहरु यांच्या १६४ व्या जयंतीनिमित्त आज पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवनमध्ये सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे प्रा. एन. डी. बिरनाळे आणि पैगंबर शेख यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले होते.
यावेळी स्वागत प्रास्ताविक करताना मौला वंटमुरे यांनी छ. शाहू महाराजांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रा. एन.डी.बिरनाळे, अनिल मोहिते, पैगंबर शेख यांनी छ. शाहू महाराजांच्या शैक्षणिक, सामाजिक व क्रिडा क्षेत्रातील लक्षवेधी योगदानाचा उल्लेख करताना छ. शाहू महाराजानी समता प्रस्थापित केली. वंचितासाठी आरक्षणाचा कायदा केला. महिला उन्नतीसाठी झटले. शेतकरी, कामगार, वंचित वर्गाला न्याय दिला. अशा मुद्द्यांचा परामर्ष घेऊन पंडीत मोतीलाल नेहरु यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
अजित ढोले यांनी छ. शाहू महाराज व पंडीत मोतीलाल नेहरु यांच्या मोठेपणाच्या घटना सांगितल्या तसेच त्यांनी परभणी काँग्रेस पदयात्रा सहभाग माहिती दिली. अरुण पळसुले यांनी आभार मानले.
यावेळी प्रा. एन.डी.बिरनाळे, अजित ढोले,अनिल मोहिते, विश्वास यादव, पैगंबर शेख, मौला वंटमुरे, अरुण पळसुले, विठ्ठलराव काळे,पत्रकार आप्पा पाटणकर, गणेश वाघमारे,शिवाजी माळी मुफीत कोळेकर, गालीब मुल्ला व शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.