yuva MAharashtra भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धविरामाची अधिकृत घोषणा; पुन्हा चर्चा १२ मे रोजी !

भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धविरामाची अधिकृत घोषणा; पुन्हा चर्चा १२ मे रोजी !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ११ मे २०२५

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षावर अखेर पूर्णविराम लागला असून, दोन्ही देशांनी तात्काळ आणि संपूर्ण युद्धविराम स्वीकारल्याचे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी जाहीर केले आहे. आज दुपारी ३:३५ वाजता पाकिस्तानचे डीजीएमओ आणि भारताचे डीजीएमओ यांच्यात दूरध्वनीवरून संवाद झाला. या चर्चेनंतर सायंकाळी ५ वाजेपासून सीमारेषेवरील कारवाया थांबवण्यात आल्या असल्याचे मिस्त्री यांनी स्पष्ट केले. पुढील टप्प्यात, १२ मे रोजी दुपारी १२ वाजता दोन्ही देशांचे डीजीएमओ पुन्हा एकदा चर्चेसाठी संपर्क साधतील, असेही त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी आधीच दिली होती माहिती

या घोषणेपूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया मंच ‘एक्स’ वर पोस्ट करत भारत-पाकिस्तान युद्धविरामावर सहमती झाल्याचे जाहीर केले होते. अमेरिकेच्या प्रयत्नांमुळे रात्री झालेल्या चर्चेनंतर ही सहमती झाली असल्याचा दावा त्यांनी केला. ट्रम्प यांनी या टप्प्यावर दोन्ही देशांचे अभिनंदनही केले.


पाकिस्तानकडूनही पुष्टी

पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनीही एक्सवरून घोषणा करत युद्धविरामास दुजोरा दिला. त्यांनी असे सांगितले की, पाकिस्तानने नेहमीच शांतता आणि स्थैर्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, त्यांनी भारतावर झालेल्या अपयशी हल्ल्यांची कोणतीही कबुली दिली नाही.