| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ मे २०२५
दिनांक 15 मे 2025 रोजी भारतीय जनता पार्टीच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक श्री प्रकाश ढंग यांची फेर निवड करण्यात आली. त्या संदर्भात त्यांना निवडीचे पत्र माजी आमदार तथा जिल्हा निरीक्षक सुरेश भाऊ हळवणकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सांगली विधानसभा आमदार सुधीर दादा गाडगीळ, मिरज विधानसभा आमदार तथा माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे ,भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश बिरजे यांचा प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष श्री.प्रकाश ढंग बोलताना म्हणाले की, "वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे. तो सार्थ करेन आणि दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडेन. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री आदरणीय जे. पी. नड्डाजी, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र भाईजी मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित भाई शहा, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सांगली विधानसभा आमदार सुधीर दादा गाडगीळ, मिरज विधानसभा आमदार सुरेश भाऊ खाडे व सांगली शहर जिल्हा कोर कमिटी सदस्यांनी या सर्व नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझी फेर निवड केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक जास्त उमेदवार निवडून येतील याची ग्वाही मी आपणास देतो."
यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य नीता ताई केळकर, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैय्या पवार, भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस स्वातीताई शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे - म्हैसाळकर, जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील, मोहन वाटवे, गीताताई पवार, राजू चव्हाण, प्रवीण जाधव, सर्व जिल्हा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, मंडल अध्यक्षबूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, व कार्यकर्ते उपस्थित होते.