yuva MAharashtra स्व. राजीव गांधी यांच्या स्मरणात व भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ सांगलीत 21 मे रोजी तिरंगा रॅली !

स्व. राजीव गांधी यांच्या स्मरणात व भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ सांगलीत 21 मे रोजी तिरंगा रॅली !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ मे २०२५

दिनांक 21 मे2025 रोजी भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी व भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ सांगली येथे हुतात्मा स्मारक मार्केट यार्ड समोर ते काँग्रेस भवन सांगली अशी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे यावेळी काँग्रेस सेवा दलाचे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील 40 ते 50 पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे अशी माहिती सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी, सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाची काँग्रेस भवन सांगली येथे आयोजित बैठकीत दिली.

यावेळी गुलाबराव भोसले यांनी सेवा दलाची जिल्ह्याची पदाधिकारी यांची एक समिती नेमून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी व त्यामध्ये सेवा दलाला 20 टक्के प्रतिनिधित्व द्यावे त्यासाठी सेवा दलाचे सर्व कार्यकर्ते आपल्या पक्षाचे प्रचारामध्ये अग्रभागी असतील असे सांगितले.


यावेळी सेवा दलाचे शहर कार्याध्यक्ष अनिल मोहिते यांनी काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकारणी मध्ये थोडा बदल करून नवीन पदाधिकारी यांना संधी देण्यात यावी आणि जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणच्या माध्यमातून सेवा दलाला मजबूत करावे त्यामुळे काँग्रेस पक्षही बळकट होईल असे त्यांनी आवाहन केले

सदरच्या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात भाजपाच्या एका मंत्र्यांनी विजय शहा यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केले होते त्याच्या निषेधाचा ठराव शिराळाचे तालुकाध्यक्ष श्री तुकाराम चव्हाण यांनी मांडला. त्याला पलूस तालुका अध्यक्ष सुशांत जाधव यांनी व जिल्हा संघटक अल्लाबक्ष मुल्ला यांनी अनुमोदन दिले 

यावेळी पैगंबर शेख, कडेगावचे रमेश रासकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण धोत्रे, मीना शिंदे, शमशाद नायकवडी, कवठेमंकाळ अध्यक्ष श्रीकांत फाकडे, आटपाडी अध्यक्ष नारायण मोटे, मौलाली वंटमोरे, कवलापूरचे सुरेश पाटील, शैलेंद्र पिराळे, सुरेश गायकवाड इत्यादी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.