| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ मे २०२५
मा सत्यम गांधी आयुक्त यांनी शहरातील मुख्य रस्ते रहदारीच्या साठी खुले ठेवण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यादृष्टीने उप आयुक्त वैभव साबळे यांच्या टीमला सूचना दिल्या होत्या,
काल छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई ते गरवारे कॉलेज या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता नागरिकांच्या साठी खुला केला आहे, या पुढे देखील तो नागरिकांचा साठी खुला राहील असे नियोजन केले आहे.
उप आयुक्त वैभव साबळे यांनी समक्ष जागेवर उभे राहून सदरचा कारवाईचे नेतृत्व केले, काल साधारणपणे १२ कट्टे ,तसेच ३ हातगाड्या जागेवर तोडून कारवाई केली.
नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. यापुढे सातत्य ठेऊन रस्ता रहदारीसाठी खुला ठेवावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
मा आयुक्त सत्यम गांधी यांनी शहरातील भाजीपाला, अन्य रस्त्यावर विक्री करणाऱ्यांसाठी खुल्या भूखंडावर बसण्याचे नियोजन केले आहे. प्रभाग समिती निहाय नियोजन करण्यात येणार आहे. सर्व विक्रेते यांना विश्वासात घेऊन सदरची कार्यवाही पुढील काळात केली जाणार आहे. फेरीवाला धोरण, अन्य मार्गाने त्याचे पुनर्वसन नियोजन करण्यात येणार आहे.
शिवाजी मंडई परिसरातील अतिक्रमण हटवल्यानंतर, मारुती रोड, कापड पेठ, बालाजी चौक, मित्र मंडळ चौक ते महापालिका चौक या महत्त्वाच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. नेहमी वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावर भाजीविक्रेते आणि काही व्यापाऱ्यांचे अतिक्रमण ही नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. मा. आयुक्तांनी या रस्त्यावरील अतिक्रमणाकडेही लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
काल झालेल्या शिवाजी मंडई परिसरातील अतिक्रमण हटाव कारवाईमध्ये सहा आयुक्त सहदेव कावडे, अतिक्रमण टीम यांनी महत्वाची कामगिरी केली आहे.