| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ मे २०२५
सांगलीतील सुप्रसिद्ध मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेढीने (पीएनजी) सांगलीतील एसटी स्टँडवर प्रवाशांसाठी वॉटर कूलरची व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेचा प्रारंभ पीएनजीचे संचालक आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि मिलिंद गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पीएनजीचे संचालक सिद्धार्थ गाडगीळ, तेजस गाडगीळ आदी उपस्थित होते.
सांगली एसटी स्टँडवर प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. सध्या कडक उन्हाळ्याने लोक त्रस्त झाले आहेत. थंड व शुद्ध पाणी मिळणे गरजेचे झाले आहे. ही निकड लक्षात घेऊन पीएनजीने एसटी स्टँडवर दोन वॉटर कुलर बसविण्याचे ठरवले. त्यानुसार एस. टी. स्टँडमध्ये चौकशी कक्षाजवळ एक आणि एस. टी.चे चालक, वाहक, तसेच वर्कशॉपमधील कर्मचारी त्यांच्यासाठी वर्कशॉपमध्ये एक असे दोन वॉटर कुलर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासी आणि एस. टी. कर्मचाऱ्यांना आता शुध्द आणि थंडगार पाणी उपलब्ध झाले आहे.
या कार्यक्रमास शैलेश पवार, केदार खाडीलकर, रविंद्र वादवणे, सांगली एसटी विभागाचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी सतीश पाटील, सांगली एस.टी. आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, आगारातील चालक, वाहक, सुपरवायझर, कर्मचारी, प्रवासी आदी उपस्थित होते.