| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ८ मे २०२५
आयुक्त मा सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सभा, स्थायी समिती सभा, मा आमदार जगदाळे स्थायी समिती सभागृहात सांगली येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहदेव कावडे नगरसचिव यांनी विषयपत्र वाचन केले. सर्व विभाग प्रमुख या सभेस उपस्थितीत होते.
अतिक्रमण कारवाई मध्ये नाशवंत आणि अन्य भंगार साहित्य मनपाच्या अतिक्रमण विभाग पडून असते, त्यांच्या लिलाव प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यास मान्यता देण्यात आली.
शहरातील पावसाचे पाणी साचलेले निचरा करण्यासाठी पाण्या खाली जाणारे रस्ते, त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सदरची योजना राबविण्यात येणार आहे,
जागतिक बँक पुरस्कुत महाराष्ट्र प्रतिसदात्मक विकास कार्यक्रम ( MRDP) अंतर्गत reauest for proposal( RFP) for प्रोजेक्ट मॅनेजमेंट and technical consultancy (PMTC) for project implementatiin unit (PIU)मनपा साठी मान्यता मिळणे साठी विषयपत्र सादर केले होते त्यास मान्यता देण्यात आली.
पाणी पुरवठा विभागकडील जल शुद्धीकरण साठी पी ए सी पावडर वार्षिक आवश्यकता १५५मेट्रेट टन स्पेसिफिकेशन नुसार रक्कम र ५८.६१.१४४/- खरेदी करणेस मान्यते साठी विषयास मान्यता देण्यात आली आहे, या कामी लेखशीर्ष बदल होणार आहे.
या वेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ, उप आयुक्त शिल्पा दरेकर, विजया यादव, वैभव साबळे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, कार्यकारी अभियंता कुरणे, मुख्य लेखापाल अभिजित मेंगडे, सहा आयुक्त, सर्व खाते प्रमुख उपस्थितीत होते.