yuva MAharashtra सार्वजनिक ठिकाणी बांधकाम साहित्य टाकले प्रकरणी मिरज येथील डॉक्टर चंद्रपट्टन यांना ५० हजार दंड !

सार्वजनिक ठिकाणी बांधकाम साहित्य टाकले प्रकरणी मिरज येथील डॉक्टर चंद्रपट्टन यांना ५० हजार दंड !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ मे २०२५

आयुक्त मा. सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार उप आयुक्त स्मृती पाटील, डॉ रवींद्र ताटे यांच्या टीमने मिरज येथील सार्वजनिक ठिकाणी C & D मटेरिअल टाकले असल्याचे निदर्शनास आलेवरून डॉ. अनिल चंद्रपट्टन यांना रु. ५० हजार इतक्या रकमेच्या दंड आकारण्यात आला आहे. अशी माहिती या वेळी डॉ ताटे यांनी दिली आहे.

या वेळी मा. उपायुक्त स्मृती पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. ताटे, स्वच्छता निरीक्षक जिजाराम मोरे, अक्षय कोलप, नितीन कांबळे व मुकादम कर्मचारी उपस्थित होते.


तिन्ही शहरातील रस्त्यावर विना परवाना बांधकाम साहित्य रस्त्यावर उतरून रस्ता रहदारीस अडचण निर्माण झाली तर कारवाई केली जाणार आहे, असे या वेळी उप आयुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले आहे.