yuva MAharashtra मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखची कन्या वैभवीनं बारावी परिक्षेत गाठलं यशोशिखर !

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखची कन्या वैभवीनं बारावी परिक्षेत गाठलं यशोशिखर !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ मे २०२५

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी निर्घृण हत्या झाली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती आणि देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

मात्र अशा कठीण प्रसंगातही त्यांची कन्या वैभवी देशमुख हिने अदम्य जिद्द दाखवत बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एचएससी बोर्डाचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून वैभवीला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. तिने एकूण 600 पैकी 512 गुण प्राप्त करत आपल्या मेहनतीचं फळ मिळवलं आहे.

विषयनिहाय गुण असे:

इंग्रजी: 63

मराठी: 83

गणित: 94

भौतिकशास्त्र (Physics): 83

रसायनशास्त्र (Chemistry): 91

जीवशास्त्र (Biology): 98



पित्याच्या दुःखद घटनेनंतर केवळ दोन महिन्यांत वैभवीने परीक्षा दिली होती. निकालाच्या दिवशी सकाळी तिने वडिलांच्या प्रतिमेला वंदन करत, "त्यानंतरच मी त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील आहे," असं भावनिक वक्तव्य केलं. "आज वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी नाहीत, याची हुरहुर वाटते," असं ती म्हणाली.

राज्याचा निकाल जाहीर

यंदा बारावीचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. कोकण विभागाने सर्वाधिक निकाल टक्केवारीसह बाजी मारली आहे. विशेष म्हणजे यंदाही मुलींनी निकालात आघाडी घेतली असून 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर 89.51 टक्के मुलं यशस्वी झाली आहेत. मुलींनी मुलांपेक्षा 5.07 टक्के अधिक यश संपादन केलं आहे.

निकाल पाहण्याच्या वेबसाईट्स:

mahresult.nic.in

results.digilocker.gov.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org


निकाल पाहण्याची प्रक्रिया:

1. वरील संकेतस्थळांपैकी कोणत्याही एकावर जा.


2. HSC Result 2025 लिंकवर क्लिक करा.


3. आपला परीक्षा क्रमांक व इतर माहिती टाका.


4. सबमिट केल्यावर निकाल स्क्रीनवर दिसेल.


5. तो सेव्ह व प्रिंट करून ठेवा.