| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ मे २०२५
सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षपदी विवेक कोकरे यांची निवड करणेत आली. जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पक्ष निरीक्षक अरुण असबे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करणेत आली.
तसेच तालुका निरीक्षक म्हणून अमोल शिंदे-खानापूर, दिनकर पाटील-आटपाडी, मनोज शिंदे व चिमण डांगे-कवठेमहांकाळ, टी व्ही पाटील व राजू पाटील - मिरज, ताजुद्दीन तांबोळी-पलूस व कडेगाव, आनंद राव पाटील-शिराळा, संग्राम देशमुख-वाळवा, दत्ताजी पाटील-जत यांच्या निवडी करणेत आल्या. नूतन अध्यक्ष व निरीक्षकांचा यावेळी सत्कार करणेत आला.
यावेळी आ अरुण आण्णा लाड, निरीक्षक अरुण असबे, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, ताजुद्दीन तांबोळी, हायुम सावनूरकर, बी के नायकवाडी, महिला अध्यक्षा सुस्मिता जाधव, संजय पाटील, नूतन युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांची भाषणे झाली.
यावेळी महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष संजय बजाज, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, अनिता सगरे, रमेश पाटील, विराज नाईक, जिल्हा बँकेचे संचालक बी एस पाटील, राजू जानकर, अजित दुधाळ, मन्सूर खतीब, विश्वास माने पाटील, वास्कर शिंदे, किसन जानकर, जयदीप यादव, टी व्ही पाटील, गीतांजली इरकर, उत्तम चव्हाण, सुरेश शिंगटे, यांचेसह प्रदेश सदस्य, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, युवक पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. राजू पाटील यांनी स्वागत केले. तर अमोल शिंदे यांनी आभार मानले.