yuva MAharashtra मेटा आणि रे-बनचा नवा प्रयोग: स्मार्ट चष्म्याचे अनोखे आगमन!

मेटा आणि रे-बनचा नवा प्रयोग: स्मार्ट चष्म्याचे अनोखे आगमन!


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ मे २०२५

तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात, स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच नंतर आता स्मार्ट चष्मा देखील आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनण्यास सज्ज आहे. प्रसिद्ध गॉगल उत्पादक रे-बन आणि सोशल मीडिया कंपनी मेटा यांनी एकत्र येत अत्याधुनिक स्मार्ट चष्मा बाजारात सादर केला आहे.

या नव्या स्मार्ट चष्म्याद्वारे युजर्सना केवळ फॅशनची अनुभूतीच नव्हे, तर टेक्नॉलॉजीचाही आधुनिक स्पर्श मिळणार आहे. या चष्म्यांमध्ये कॅमेरा, माईक, स्पीकर आणि व्हॉईस कंट्रोल यांसारखी फिचर्स देण्यात आली असून, युजर्स सोशल मीडियावर थेट व्हिडिओ आणि फोटो शेअर करू शकतात. तसेच कॉल्स, म्युझिक आणि व्हॉईस असिस्टंटचा वापर देखील करता येतो.


किंमतीबाबत बोलायचं झालं, तर जागतिक बाजारात या चष्म्याची सुरुवातीची किंमत सुमारे ३०० डॉलर (अंदाजे २५,००० रुपये) इतकी असू शकते. मात्र भारतात उपलब्धतेबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हा स्मार्ट चष्मा आधुनिक युगातील डिजिटल अनुभव अधिक सुलभ, स्मार्ट आणि स्टायलिश बनवण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरतोय.