yuva MAharashtra हिंदुत्ववादी शिवभक्तांनो शिवराज्याभिषेक दिन तिथीप्रमाणेच साजरा करा ; माजी आमदार नितीन शिंदे

हिंदुत्ववादी शिवभक्तांनो शिवराज्याभिषेक दिन तिथीप्रमाणेच साजरा करा ; माजी आमदार नितीन शिंदे


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ मे २०२५

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक साडेतीनशे वर्षांपूर्वी तिथी, वेळ, दिवस पाहून हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार मुहूर्त काढून रायगडावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक तिथीनुसार झाला त्याच दिवशी हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे आज आपण हिंदू म्हणून जगत आहोत. तिथीनुसार सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी शिवराज्याभिषेक दिन येतो. सर्व हिंदू धर्मीय दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, नवरात्र उत्सव तसेच अनेक हिंदु सण, आपल्या घरातील लग्न, कार्य, भूमिपूजन, वास्तुपूजन हे तिथीनुसारच करतात. तसेच मृत्युनंतरचे हिंदू धर्मामध्ये विधी कार्य देखील तिथीनुसारच करतात. म्हणून राज्यातल्या हिंदुत्ववाद्यांनी व शिवभक्तांनी 9 जून 2025 रोजी चा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या थाटामाटात पारंपारिक पद्धतीने साजरा करावा असे आवाहन हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले आहे. 

अफजल खान वध दिन म्हणजेच शिवप्रताप दिन सातारा जिल्हा प्रशासन हे तिथीनुसारच प्रतापगडावर भगव्या ध्वजाला मानवंदना देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून मोठ्या थाटामाटात साजरा करते. हिंदू एकता आंदोलन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसारच साजरी करते. 


श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांनी जे तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे त्याला हिंदू एकका आंदोलन, महाराष्ट्र राज्याचा पाठिंबा राहील असे हिंदू एक आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगितले. 

माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी संजय जाधव, अवधूत जाधव, राजू जाधव, अनिरुद्ध कुंभार, पै. प्रदीप निकम, मनोज साळुंखे, प्रसाद रिसवडे, गजानन मोरे, प्रकाश चव्हाण, सोमनाथ गोठखिंडे, सुमित शिंगे आदींनी शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसारच साजरा करण्याचे आवाहन केले आहे.