| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ४ मे २०२५
१२ वीचे पेपर्स झाल्यावर विद्यार्थ्यांच्या मनात हमखास एकच प्रश्न उरतो – “आता पुढे काय?” काहीजण NEET किंवा JEE परीक्षांच्या तयारीला लागतात, तर काहीजण खर्चिक आणि दीर्घकालीन कोर्सेस टाळत थेट कारकीर्द घडवणाऱ्या छोट्या अभ्यासक्रमांचा विचार करतात.
पण जर हे अल्पकालीन कोर्सेसच तुम्हाला थोडक्याच वेळात आणि कमी खर्चात मोठ्या पगाराच्या संधी देत असतील, तर? चला, जाणून घेऊया असेच १२वी नंतर करता येणारे ५ अभ्यासक्रम जे तुमचं भविष्य उजळवू शकतात:
१. डिजिटल मार्केटिंग
सोशल मीडियाच्या जगात ‘डिजिटल मार्केटिंग’ हे आजचं हॉट करिअर आहे. Instagram, YouTube, Google Ads यांसारख्या प्लॅटफॉर्मवर ब्रँड प्रमोट करण्याचं कौशल्य मिळवून तुम्ही घरबसल्या चांगली कमाई करू शकता. या कोर्सनंतर फ्रीलान्सिंग, स्टार्टअप किंवा चांगली नोकरी – सर्व पर्याय खुले होतात.
२. डेटा सायन्स
डेटा हे २१व्या शतकाचं सोनं आहे! डेटा सायन्स कोर्समधून तुम्ही Python, मशीन लर्निंग, अल्गोरिदम यांसारख्या तंत्रज्ञानांचा अभ्यास करून कंपन्यांसाठी मौल्यवान निर्णय घेणं शक्य होतं. या क्षेत्रात एकदा पाय रोवला की, लाखोंचं पॅकेज मिळवणं सहज शक्य आहे.
३. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)
AI म्हणजे भविष्यातील क्रांती. NLP, ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि मशीन लर्निंग यांसारख्या विषयांचा अभ्यास करून तुम्ही नावाजलेल्या कंपन्यांमध्ये करिअर करू शकता. हा कोर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात सहज उपलब्ध आहे.
४. हार्डवेअर व नेटवर्किंग
इंजिनिअरिंग करायला जमलं नाही, तरी चिंता नको. हार्डवेअर आणि नेटवर्किंग कोर्स करून तुम्ही IT क्षेत्रात आपली जागा मिळवू शकता. संगणक दुरुस्ती, नेटवर्क सेटअप आणि सपोर्ट यासारख्या स्किल्सना नेहमी मागणी असते.
५. बिझनेस व मॅनेजमेंट कोर्सेस
कॉर्पोरेट क्षेत्रात झेप घ्यायची असेल, तर BBA, मार्केटिंग, फायनान्स किंवा मॅनेजमेंट कोर्सेस फायदेशीर ठरू शकतात. PGDM किंवा MBA करून तुम्ही MNC कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम करू शकता.
शेवटी एकच सांगायचं – शिक्षणाची दिशा ठरवताना वेळ वाया घालवू नका. योग्य कोर्स निवडा आणि उज्वल भविष्यासाठी पहिले पाऊल टाका !