yuva MAharashtra महापालिकेच्या वृक्ष गणनेत सहा लाख वृक्षांची गणनापूर्ण !

महापालिकेच्या वृक्ष गणनेत सहा लाख वृक्षांची गणनापूर्ण !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ मे २०२५

तीन महिन्यात दहा लाख वृक्षांची गणना पूर्ण होणार - 208 झाडाच्या प्रजाती सह 2445 प्राचीन वृक्ष सापडले असून वृक्ष गणनाना अत्यंत महत्वाचा टप्पा पूर्ण करण्यात मनपा यशस्वी झाली आहे, पुढील काळात वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी लोक सहभागातून व्यापक मोहीम राबविणार असल्याचे सांगली महापालिकेचे आयुक्त मा सत्यम गांधी यांनी सांगितले.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून सध्या महापालिका क्षेत्रात वृक्ष गणना सुरू आहे यासाठी एका खाजगी कंपनीकडून ही वृक्ष गणना केली जात असून दोन महिन्यांमध्ये सहा लाख वृक्षांची गणना पूर्ण करण्यात आली आहे उर्वरित वृक्ष गणना पुढील तीन महिन्यात पूर्ण केली जाणार असून एकूण दहा लाख वृक्षांची गणना पुढील तीन महिन्यात पूर्ण होणार आहे. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या सूचनेनुसार ही वृक्ष गणना सुरू आहे.


पहिल्यांदाच महापालिका क्षेत्रातील वृक्षांची डिजिटल गणना होत असल्यामुळे या सर्व वृक्षांची ऑनलाइन नोंद पाहता येणार आहे. महापालिकेच्या 20 प्रभागात सध्या वृक्षगणना सुरू असून यासाठी खाजगी एजन्सी चे 75 कर्मचारी काम करीत आहेत . यामध्ये 10 सेंटीमीटर रुंदी तसेच 10 फूट उंची मोजली जाते. याचबरोबर झाडांची सद्यस्थिती सुद्धा बघितली जाते. झाडाच्या सावलीचा घेर तपासला जातो. आत्तापर्यंत 6,09,466 झाडाचा सर्व्हे पूर्ण झाला असून यामध्ये 208 झाडाच्या प्रजाती आढळल्या असून 2445 प्राचीन वृक्ष या वृक्ष गणनेमध्ये सापडले आहेत. महापालिका क्षेत्रात पुढील तीन महिने वृक्ष गणना सुरू राहणार असून यामध्ये आणखीन चार लाख वृक्ष गणना पूर्ण केली जाणार असल्याचे महापालिकेचे वृक्ष अधिकारी गिरीश पाठक यांनी सांगितले.