yuva MAharashtra सिनर्जी हॉस्पिटलमध्ये रोटाअब्लेशन एन्जिओप्लास्टीद्वारे वृद्ध रुग्णांना नवे जीवनदान !

सिनर्जी हॉस्पिटलमध्ये रोटाअब्लेशन एन्जिओप्लास्टीद्वारे वृद्ध रुग्णांना नवे जीवनदान !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ मे २०२५


डॉ. प्रदीप देवकाते यांची कौशल्यपूर्ण रुग्णसेवा; 
'देवदूत' म्हणून रुग्णांत आदराचे स्थान

"जे जीवांचे करावे रक्षण, ते खरे संतांचे लक्षण" 
– संत तुकारामांचा हा विचार जणू डॉ. प्रदीप देवकाते यांच्यासाठी लागू होतो.

मिरज येथील सिनर्जी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभागाचे संचालक व प्रमुख डॉ. प्रदीप देवकाते यांनी तंत्रज्ञान व कौशल्य यांच्या सहाय्याने एक महत्त्वपूर्ण वैद्यकीय यश संपादन केले आहे. वयाची ६०, ६७ आणि ८२ अशी सहा व आठ दशकं ओलांडलेले तीन वृद्ध रुग्ण, ज्यांच्या हृदयातील ब्लॉकेज अत्यंत कठीण स्वरूपाचे होते, त्यांच्यावर शस्त्रक्रियेने यशस्वी उपचार करत त्यांना नवजीवन मिळवून दिले आहे.

कठीण परिस्थितीत नवी दिशा

हृदयविकार हे आता केवळ वृद्धांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. अनेकदा लवकर निदान न झाल्यास तरुणांचेदेखील जीव धोक्यात येतात. काही रुग्णांमध्ये धमनीत कॅल्शियमचे क्षार साठल्याने ती अत्यंत कठीण बनते व त्यावर नेहमीची एन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करणे धोकादायक ठरते. अशा अवस्थेत रोटाअब्लेशन एन्जिओप्लास्टी हीच एकमेव उपाययोजना असते.

रोटाअब्लेशन – एक अत्याधुनिक उपचार


सिनर्जी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप देवकाते यांनी या उपचाराबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, रोटाब्लेटर नावाच्या खास उपकरणाचा वापर केला जातो. कॅथेटरच्या टोकाला असलेला सुक्ष्म हिऱ्याचा भाग कॅल्शियमचे साठे किरकोळ कणांमध्ये विभागतो, जे शरीरातून सहज बाहेर पडतात. हे उपकरण तब्बल 1.6 लाख आरपीएम वेगाने फिरते, आणि तरीही धमन्यांचे नुकसान न करता उपचार शक्य करतो.

डॉ. देवकाते यांचा अनुभव आणि संवेदनशीलता


एका ६७ वर्षीय रुग्णाच्या पूर्वी झालेल्या बायपास शस्त्रक्रियेनंतर पुन्हा त्याच धमनीस ब्लॉकेज निर्माण झाले होते. पारंपरिक उपचार अशक्य असल्याने दूरस्थ संरक्षण साधन (distal protection device) नावाच्या उपकरणाने प्रथम धमन्यात साठलेले कोलेस्टेरॉलचे थर काढून टाकले व नंतर ॲन्जिओप्लास्टी या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्या रुग्णाला नवजीवन मिळाले. 

तद्नंतर, ६० व ८२ वर्षांचे दोन वृद्ध रुग्ण रोटाअब्लेशन या पद्धतीने उपचार घेऊन आता सामान्य जीवन जगू लागले आहेत.

धमनीतील अडथळा दूर झाला...
हृदयाचे सुख खुले झाले

कॅल्शियममुळे कठीण झालेल्या धमनीमुळे रुग्णांना छातीत दुखणे, दम लागणे, किडनीच्या समस्या भेडसावत असतात. अनेक रुग्णांमध्ये ब्लडप्रेशर, मधुमेह यासारख्या जोडरोगांनी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची केली होते. यावर केवळ रोटाअब्लेशन उपचारच प्रभावी ठरतात.

डॉ. देवकाते – नावातच ‘देव’

बेंगळुरू येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षे सेवेत असलेले डॉ. देवकाते हे आता सिनर्जी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याने आजवर असंख्य रुग्णांना जीवनदान मिळाले असून, त्यांची सेवा ही केवळ वैद्यकीय नव्हे तर मानवतेचा आदर्श ठरली आहे.

"ज्याची सेवा तीर्थाहून पवित्र, तोच खरा संत" 
– अशा संतवचनासारखा डॉ. देवकाते यांचा प्रवास आरोग्यसेवेचा दीपस्तंभ ठरला आहे.

सिनर्जी हॉस्पिटलमध्ये रोटाअब्लेशनसारख्या उच्चतम वैद्यकीय उपचारपद्धतींचा समावेश झाल्याने, हृदयविकार रुग्णांसाठी हे ठिकाण विश्वासाचे केंद्र बनले आहे. डॉ. देवकाते यांचे तंत्रज्ञानातील प्राविण्य व सेवाभाव यामुळे हृदय रुग्णांना नवा श्वास, नवे जीवन मिळत आहे – आणि म्हणूनच नावातच 'देव' असलेल्या या हृदयरोग तज्ञास रुग्ण व त्यांचे नातेवाईक 'देवदूत' मानत असल्यास नवल नाही.