yuva MAharashtra कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस भवन येथे अभिवादन !

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस भवन येथे अभिवादन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० मे २०२५

थोर समाज सुधारक शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त सांगली जिल्हा काँग्रेस शहर व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा विजयराव नवले जिल्हा सचिव सचिन चव्हाण यांच्या हस्ते कर्मवीर आण्णा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व बाकीचे उपस्थितांनी फुले वाहून आदरांजली वाहिली.

यावेळी बोलताना विजयराव नवले यांनी कर्मवीर अण्णा यांनी तळागाळातील गोरगरीब मुलांना शिक्षण देऊन त्यांना कमवा व शिका या माध्यमातून संघटित करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम केले आहे. आज रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वटवृक्ष उभा केला आहे त्या छत्रछायेखाली कित्येक मुले मुली शिक्षण घेत आहेत त्यांचा आदर्श आपण सर्वांनी डोळ्यापुढे ठेवून कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी अनिल मोहिते कार्याध्यक्ष शहर जिल्हा काँग्रेस सेवा दल यांनीही आपल्या जीवनातील काही प्रसंग सांगून त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदरांजली वाहिली.

स्वागत व प्रस्ताविक सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले शेवटी आभार पैगंबर शेख यांनी मांनले.