yuva MAharashtra सेवा, गुणवत्ता आणि वाजवी किंमतीमुळे 'गो गॅस' एजन्सी भविष्यात आघाडीवर राहील - प्रा. तोहीद मुजावर

सेवा, गुणवत्ता आणि वाजवी किंमतीमुळे 'गो गॅस' एजन्सी भविष्यात आघाडीवर राहील - प्रा. तोहीद मुजावर


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ मे २०२५

सांगली – कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड (CPIL) अंतर्गत सुरू झालेल्या ‘गो गॅस’ एजन्सीच्या नव्या कार्यालय आणि गोडाऊनचे उद्घाटन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. पदमाळे फाटा, चव्हाण मळा येथे वैभव हॉटेल शेजारी भोसले गार्डन समोर ‘ऐश्वर्या ट्रेडिंग कंपनी’च्या नावाने कार्यरत होणाऱ्या या एजन्सीचे मालक संतोष पाटील आहेत.

या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे प्रा. तोहीद मुजावर यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक व सांगली अर्बन बँकेचे माजी संचालक रमेश (अण्णा) चव्हाण यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला. यावेळी सराफ व्यापारी व सुधाकर गोल्ड स्मिथचे प्रमुख सुधाकर नार्वेकरही उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी प्रा. मुजावर म्हणाले, “संतोष पाटील हे समाजासाठी न थकता, न थांबता काम करणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी सुरू केलेली ही गो गॅस एजन्सी गुणवत्तापूर्ण सेवा, परवडणाऱ्या दरात सिलेंडर आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे भविष्यात यशाच्या शिखरावर पोहोचेल, याबद्दल मला खात्री आहे.”

रमेश चव्हाण यांनी सांगितले की, “संतोष पाटील यांच्या समाजाभिमुख कार्यामुळे मी स्वतः माझी जागा त्यांना गोडाऊन व ऑफिससाठी दिली आहे. त्यांनी हे काम प्रामाणिकपणे चालवावे आणि व्यवसाय वाढवावा, हीच शुभेच्छा.”


सुधाकर नार्वेकर म्हणाले, “संतोष पाटील हे आमचे निकटवर्तीय मित्र असून ते समाजोपयोगी कार्यात नेहमी अग्रेसर असतात. आमचा ‘सराफ कट्टा मॉर्निंग ग्रुप’ त्यांना कायम साथ देत राहील.”

या वेळी चंद्रकांत मालवणकर यांनी गो गॅससाठी मार्केटिंगमध्ये मदतीचे आश्वासन दिले. “गो गॅस ही एजन्सी नव्याने सुरू होत असून, तिच्या दर्जेदार सेवा आणि वाजवी किमतीमुळे नागरिकांनी तिचा लाभ घ्यावा,” असे त्यांनी आवर्जून सांगितले.

या समारंभास प्रा. नंदकुमार सुर्वे, विजय देसाई, गजानन पोतदार, रमेश कारंडे, विनायक विभुते, शरीफ भाई, अनिल माने, अनमोल पाटील, स्वप्निल शेटे, सुशांत कदम, अरविंद ठोंबरे, प्रणव शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी संतोष पाटील यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानत, भविष्यातही दर्जेदार सेवा देण्याचा विश्वास व्यक्त केला. उपस्थितांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.