yuva MAharashtra एटीएममध्ये लवकरच १०० व २०० रुपयांच्या नोटांचा मुबलक साठा !

एटीएममध्ये लवकरच १०० व २०० रुपयांच्या नोटांचा मुबलक साठा !

फोटो सौजन्य : pixels.com

| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३० एप्रिल २०२५

एटीएममधून केवळ ५०० रुपयांच्या नोटा मिळण्याच्या तक्रारी वाढत असताना, आता सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सर्व बँकांना आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटरना त्यांच्या एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या निर्णयामुळे रोजच्या लहान-सहान व्यवहारांमध्ये ग्राहकांना सुट्टे पैशांची टंचाई भासणार नाही. अनेक वेळा नागरिकांना मोठ्या नोटा सुटण्याची अडचण भासते आणि त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भटकावे लागते. ही समस्या दूर करण्याच्या उद्देशाने आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.

आरबीआयने स्पष्ट केले आहे की, लोकांपर्यंत लहान मूल्यांच्या नोटा पोहोचाव्यात यासाठी ही अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल. बँकांसह नॉन-बँकिंग कंपन्यांकडून चालवले जाणारे व्हाईट लेबल एटीएमही या सूचनांच्या कक्षेत येणार आहेत.