| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ एप्रिल २०२५
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक, तरुणांचे आदरस्थान संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर काल रात्री एका धारक-याच्या घरातील भोजनाचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना भिडे गुरुजी यांच्यावर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला.
सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी प्रकार घडला. त्यावेळी उपस्थित धारक-यांनी त्यांना येथील शासकीय रुग्णालयात तात्काळ दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची वार्ता सांगली शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. तेव्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात धारक-यांनी मोठी गर्दी केली होती.
या घटनेने सांगली शहरातील भटक्या कुत्र्यांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकातून महापालिका प्रशासनावर टीका होत आहे. यापूर्वी भटक्या कुत्र्यांनी अनेकांवर जीवघेणे हल्ले केले आहेत. विशेषतः लहान बालके अशा भटक्या कुत्र्यांची शिकार बनलेले आहेत. अनेक बालकांना आपला जीवही गमवावा लागणार आहे. त्यामुळे आता तरी महापालिकेने अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.