| सांगली समाचार वृत्त |
डोंबिवली - दि. १६ एप्रिल २०२५
महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त, सत्यशोधक समता संघ व रिजेन्सी अनंतम उसत्व मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 13 एप्रिलला विविध क्रीडा स्पर्धा, फ्री मेडिकल कॅम्प, विविध विषयाच्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. याचे नियोजन दीपाली वरघत, विशाल सांगुरे, विनय. खाडे, विशाल कांबळे यांनी केले.
14 एप्रिलला लेझीम पथक व ढोलपथकासह भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले होते याचे संपूर्ण नियोजन डॉ. बाळासाहेब गायकवाड, अलोक बगाडे, मिलिंद पाठरे, विशाल चौरे, स्मिता बाविस्कर यांनी केले होते. शोभायात्रेनंतर डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. अरविंद कदम व इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी भन्ते राहुलबोधीनी धम्मदेसना दिली.
संध्याकाळी विविध सामाजिक विषयावर नृत्य, नाट्य व कराओके गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात नीता गायकवाड, भास्कर कांबळे, जयेश ओहळ, भीमराज यादव, नीता तांबे , आकाश गायकवाड, प्रतीक्षा गमरे इ. सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिल डांगळे, स्नेहल कांबळे व वेदांत चौरे यांनी केले.
याच कार्यक्रमात ' संविधानाची 75 वर्षे ' या अंतर्गत " हर घर -घर संविधान " हा उपक्रम राबवण्यात आला. सत्यशोधक समता संघाच्या वतीने निमंत्रित पाहुणे,गुणवंत , वक्तृत्व व क्रीडातील विजयीनां संविधानाची प्रत देऊन सन्मानीत करण्यात आले.यावेळी श्री. प्रभू कापसे व अनंतम मधील अनेक मान्यवर उपस्थित होते. यासाठी अशोक पारदे, सुभाष कडलग, प्रवीण कदम, युवराज बाविस्कर, सुरेश पेडणेकर, प्रशांत धिवर यांनी प्रचंड मेहनत घेतली. या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनात डॉ. बाळासाहेब गायकवाड, विशाल चौरे, प्रदीप तांबे, विशाल सांगणूरे यांनी खूप मेहनत घेतली.