yuva MAharashtra 'जाट' चित्रपटावर ख्रिश्चन समाजाचा रोष, सनी देओल आणि रणदीप हुड्डाविरोधात एफआयआर !

'जाट' चित्रपटावर ख्रिश्चन समाजाचा रोष, सनी देओल आणि रणदीप हुड्डाविरोधात एफआयआर !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १९ एप्रिल २०२५

'जाट' या चित्रपटाला आता वादाचे ग्रहण लागले असून, अभिनेता सनी देओल, रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंग आणि चित्रपटाचे निर्माते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ख्रिश्चन समाजाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतल्याने हा वाद उफाळून आला आहे.

जालंधरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये आयपीसी कलम २९९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ख्रिश्चन समाजाचा असा आरोप आहे की, या चित्रपटात त्यांच्या धर्माच्या भावना दुखावणारी दृश्ये आहेत. विशेषतः चर्चमधील रक्तपात दाखविणाऱ्या दृश्यांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

या सर्व प्रकारामुळे चित्रपटातील कलाकार आणि निर्मात्यांची अडचण वाढली आहे. 'जाट' चित्रपटात सनी देओलने प्रमुख भूमिका साकारली असून, आता या प्रकरणामुळे संपूर्ण टीम चर्चेत आली आहे.