yuva MAharashtra ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून खा. विशाल पाटील यांच्यासाठी अद्यापही रेडकार्पेट !

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून खा. विशाल पाटील यांच्यासाठी अद्यापही रेडकार्पेट !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ एप्रिल २०२५

खा. विशाल दादा पाटील यांनी आपण आगामी पाच वर्षे अपक्ष म्हणूनच कार्यरत राहणार असल्याचे वक्तव्य करून, गेले पंधरा दिवस सांगली जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील धावून निघालेले राजकीय वातावरण, या विषयावर भाष्य करून पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र राज्याचे उच्चल तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी, खा. विशाल पाटील यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून हा विषय जागता ठेवला आहे.

पंधरा दिवसापूर्वी खा. विशाल पाटील यांनी, "आपण भविष्यात काँग्रेसमध्ये राहून किंवा अन्य पक्षात." असे सांगून राजकीय भूकंप घडवून आणला होता. आपले पूर्वीचे विधान खोडून काढले होते. मात्र दोनच दिवसापूर्वी त्यांनी आपण पुढील पाच वर्ष अपक्ष राहणार असल्याचे सांगून काँग्रेससह आहे भाजपलाही समान अंतरावर ठेवले.

खा. विशाल पाटील यांचा आक्रमक स्वभाव, उत्तम वक्तृत्व शैली यामुळे त्यांचा चाहता वर्ग केवळ सांगली जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येतो. संसदेतील त्यांचे कामगिरी नेत्र दीपक मानले जाते. असा लोकप्रिय खासदार आपल्या पक्षात असावा, अशी भाजपाच्या नेत्यांची आहे.


दुसरीकडे जिल्ह्यातील विकास कामासाठी अधिकाधिक निधी खेचून आणायचा असेल, तर सरकार पक्षाशी अर्थात भाजपाशी जवळीक साधण्याचे धोरण खा. विशाल पाटील यांचे दिसते आहे. मध्यंतरी त्यांनी केलेल्या विधानावरून राजकीय भूकंप झाला असला तरी, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम अथवा अन्य कोणत्याही नेत्याने याबाबत भाष्य केलेले नव्हते. यावरून या साऱ्यांची खा. विशाल पाटील यांच्या भूमिकेला अंतस्थ पाठिंबा आहे की काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात येताना दिसत आहे.

ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी काल केलेल्या वक्तव्याचा आता काय परिणाम होतो ? खा. विशाल पाटील अथवा अन्य नेते त्यावर काय भाष्य करतात ? हे आगामी काळात दिसून येईल. तोपर्यंत चर्चा तर होणारच...