yuva MAharashtra सांगली महापालिकामध्ये राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन उत्साही वातावरणात साजरा !

सांगली महापालिकामध्ये राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन उत्साही वातावरणात साजरा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ एप्रिल २०२५

मा रविकांत अडसूळ आयुक्त तथा प्रशासक यांच्या उपस्थितीत अग्निशमन दलाने संचलन करून मानवंदना दिली, शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली...

14 एप्रिल 1944 रोजी मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉक येथे SS पोर्ट स्टिकिन्स नावाच्या जहाजात भीषण स्फोट झाला. या स्फोटात अनेक अग्निशमन जवान शहीद झाले. 

शहीद जवानांना आदरांजली !

या दुर्घटनेतील शहीद अग्निशमन जवानांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 14 एप्रिल रोजी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन साजरा केला जातो.
1944 मध्ये मुंबई डॉकयार्ड येथे जहाजात झालेल्या स्फोटात शहीद झालेल्या अग्निशमन जवानांच्या स्मरणार्थ. १४ एप्रिल रोजी दरवर्षी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन म्हणून साजरा केला जातो,

हा दिवस अग्निसुरक्षा आणि प्रतिबंधा बद्दल जागरूकता वाढवण्यासाठी देखील साजरा केला जातो. अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी दिली आहे.


सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका वतीने १४ ते २० एप्रिल दरम्यान विविध ठिकाणी अग्निशमन दलाच्या वतीने अग्निशमन विषयक जनजागृती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
आज राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन निमित्त 
 अग्निशमन दलाच्या वतीने आग विझवण्याचे डेमो करून दाखवले. मा.आयुक्त यांनी अग्निशमन दलाचे प्राधान्यक्रम ठरवून सक्षमीकरण केले जाईल असे आश्वासित केले.  
मनपा अग्निशमन दलाकडे कमी मनुष्यबळ असून देखील नागरिकांना चांगली सेवा देत असल्याबद्दल आयुक्त तथा प्रशासक यांनी समाधान व्यक्त केले.