| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० एप्रिल २०२५
तिन्ही शहरातील कचरा उठविण्याचे मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे. अमंलबजावणी सत्वर करण्यात येणार आहे. हयगय अगर कसूर करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई करण्याचा इशारा आयुक्त मा सत्यम गांधी यांनी दिला आहे. आयुक्त मा सत्यम गांधी यांनी महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेबाबत आढावा घेतली होती. सदर बैठकीत आदेश सबधितांना दिले आहेत .
उप आयुक्त स्मृती पाटील व डॉ. रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांची बैठक डॉ वसंतदादा पाटील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने शरीरातील कचरा टाकणारे ठिकाणे शोधून स्वच्छ करण्याबाबत प्राथमिकता देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कचरा टाकणाऱ्या लोकांच्यावर यापुढे दंडात्मक कारवाई सक्तीने करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील खुले भूखंडावर, खाजगी रिकाम्या प्लॉटवर कचरा टाकणाऱ्यावर देखील यापुढे दंड आकारला जाणार आहे.
स्वच्छता दूत ही नवं संकल्पना राबविण्यात येणार आहे, यामध्ये तरुण नागरिकांच्या सहभागातून कचरा टाकणाऱ्या भागात नियुक्ती करून कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे, कचरा टाकणाऱ्यावर कारवाई होणार आहे. शहरातील बाजार परिसर व व्यापारी केंद्रामध्ये रात्रीच्या वेळी स्वच्छता करणे बाबत निर्णय घेतला आहे. सफाई कर्मचारी यांची दोन सत्रात कामकाजाचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
घंटागाडी यापुढे सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान प्रभागांमध्ये उपलब्ध होणार आहे. गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मा आयुक्तांनी दिले आहेत.
महत्वाचे मुद्दे
- स्वच्छता दूत यांची कचरा टाकणाऱ्यावर नजर राहणार !
- वाणिज्य विभागात होणार रात्री स्वच्छता !
- दोन सत्रात स्वच्छता करण्यासाठी होणार नियोजन !
- सकाळी ६:१५ वाजता येणार घंटागाडी वार्डात !