| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ एप्रिल २०२५
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची त्रैमासिक सभा आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर अभिवादन सभा 17 मे 2025 रोजी सिंधुदुर्ग येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारकात होणार आहे.. परिषदेच्या सर्व पदाधिकारयांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन एस.एम देशमुख यांनी केले आहे..
अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीच्या सभा दर तीन महिन्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात घेण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.. त्यानुसार पहिली सभा 16 मार्च 2025 रोजी नांदेड येथे घेण्यात आली.. पुढची सभा कोकणात सिंधुदुर्ग नगरीत घेतली जाणार आहे.. या सभेसाठी परिषदेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, उपाध्यक्ष, विभागीय सचिव, परिषद प्रतिनिधी, जिल्हा अध्यक्ष, डिजिटल मिडिया परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी, परिषदेच्या वतीने अधिस्वीकृती समितीवर गेलेले सदस्य, राज्य आणि जिल्हा प्रसिध्दी प्रमुख निमंत्रित आहेत.. या सर्वांनी बैठकीस उपस्थित राहणे आवश्यक आहे..
17 मे रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी आहे.. 17 तारखेला सकाळी 10 वाजता "बाळशास्त्री जांभेकर अभिवादन" सभा होईल.. त्यानंतर दुपारच्या सत्रात परिषदेची महत्वाची बैठक संपन्न होईल.. नांदेडच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची किती अंमलबजावणी झाली यावर बैठकीत चर्चा होईल..
बैठकीस निमंत्रित सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख कोकण विभागीय उपाध्यक्ष हेमंत वणजू, कोकण विभागीय सचिव मनोज खांबे, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केले आहे..
या निमित्ताने परिषदेच्या सर्व पदाधिकारयांना बाळशास्त्री जांभेकर स्मारक पाहता येईल.. उन्हाळ्यात गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन अगोदरच रिझर्वेशन करावे लागेल.. प्रतिनिधींची निवास व्यवस्था सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आली आहे..