| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ फेब्रुवारी २०२५
टेलरिंग व्यवसायात आपला धबधबा निर्माण करणाऱ्या मिरज येथील रामचंद्र रानभरे यांना नुकताच तासगाव येथील मानाचा प्रतिष्ठा पुरस्कार प्राप्त झाला होता. विविध मान्यवरांच्या हस्ते एका विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल टेलर्स वेल्फेअर असोसिएशन तर्फे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी टेलर्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री. बसवराज पाटील, तसेच जयप्रकाश होनमोरे, इम्रान मलिदवाले, रियाजभाई दर्यावर्दी, जमीरभाई जिरगाले, नरेंद्र रणभरे, जब्बारभाई बागवान, प्रताप होनमोरे, विनोद कौलपुरे, यासीन मुजावर, गीता पाटील व रेखा चौगुले आणि मान्यवर उपस्थित होते.
श्री. रामचंद्र रानभरे यांनी स्वतःचा ग्राहक वर्ग निर्माण केला असून, मनमिळावू स्वभाव, मृदू बोलणे, वक्तशीरपणा आदी गुणांमुळे ते अबालवृद्धात प्रसिद्ध आहेत. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो. विशेषतः टेलरिंग व्यवसायातील बंधू-भगिनींच्या उन्नतीसाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. अशा या समाजमान्य व्यक्तिमत्वास प्रतिष्ठा उद्योग पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.