yuva MAharashtra श्रीमती सुमनताई चौधरी यांचे हृदयविकाराने निधन !

श्रीमती सुमनताई चौधरी यांचे हृदयविकाराने निधन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ फेब्रुवारी २०२५

दक्षिण भारत जैन सभेच्या माजी महिला महामंत्री, कळंत्रे जैन श्राविकाश्रमच्या माजी चेअरमन, कस्तुरबाई ज्युनि. कॉलेज ऑफ एज्युकेशन (डी.एड्‌) कॉलेजच्या माजी प्राचार्या सुमनताई चौधरी (वय 86) यांचे काल दि. 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.30 वा. हृदयविकाराने स्वर्गवास झाला आहे. त्या स्व. दि.ब.आण्णासाहेब लठ्ठे यांच्या चुलत नात होत्या. लठ्ठे पॉलिटेक्निकचे श्री. शितल बाळासाहेब चौधरी यांच्या त्या मातोश्री होत. अत्यंत मनमिळावू, शांत व विद्यार्थी प्रिय तसेच धर्माभिमानी म्हणून त्यांची ख्याती होती.


दक्षिण भारत जैन सभेच्या माजी महिला महामंत्री म्हणून त्यांनी जैन समाजातील महिलांसाठी उन्नतीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले होते. त्याचप्रमाणे कळंत्रेअक्का जैन श्रावकाश्रमाच्या माजी चेअरमन म्हणून, तेथे वास्तव्य असणाऱ्या मुलींच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना मातृत्वाच्या हक्काची सावली दिली होती. कस्तुरबाई ज्युनि. कॉलेज ऑफ एज्युकेशन (डी.एड्‌) कॉलेजच्या माजी प्राचार्या या नात्याने देशाची भावी पिढी घडविणाऱ्या भावी शिक्षिकांना संस्काराचे धडे त्यांनी दिले होते. त्यांच्या निधनाने जैन समाज एका विदुषीला, शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वाला मुखला असल्याची भावना, समाजातून व्यक्त होत आहे.

श्रीमती सुमनताई चौधरी यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा गोतावळा आहे.